breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘Yes’ बॅंकेची वसुली थांबवली; सर्वाधिक व्याजदराच्या अमिषामुळे पिंपरी महापालिकेचे ‘983 कोटी’ अडकले

लेखा विभागाने 425 कोटी मिळावेत म्हणून 2 फेब्रुवारीला बॅंकेला दिलं पत्र

पालिका मिळकतीच्या वसुलीसाठी बॅंकेला नेमलं, पण बॅंकेने खासगी एजन्सीला केलं नियुक्त

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) खासगी येस बॅंकेवर निर्बंध लागू केल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तब्बल 983 कोटी रुपये व्याजासह ठेवी अडकल्या आहेत. मात्र, लेखा विभागाने 2 फेब्रुवारीला बॅंकेला पत्र देवून 425 कोटी रुपयांची मागणी करुनही ती रक्कम पालिकेला मिळाली नाही. दरम्यान, महापालिकेच्या मिळकतींची आयुक्तांनी तत्काळ वसुली थांबवली असून पर्यायी यंत्रणा उपलब्ध करीत पालिका कर्मचा-यांकडून वसुली करण्याचे आदेश पारित केले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी आयु्क्तांना राष्ट्रीयकृत बॅंकामधील ठेवी काढून अल्प मुदतीत कोट्यावधी रुपये ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानूसार महापालिकेला जनता बॅंकेसह अन्य काही बॅंकाचे प्रस्ताव आले होते. परंतू, महापालिका येस बॅंकेने 8.15 टक्के सर्वांधिक व्याजदर देण्यास बॅंकींग क्षेत्रातील सोयी-सुविधा उपब्धल करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महापालिकेच्या लेखा विभागाने राष्ट्रीयकृत बॅंकामधील ठेवी काढून आॅगस्ट 2018 मध्ये हजारो कोटी रुपयाच्या ठेवी येस बॅंकेकडे वर्ग केल्या.

तसेच महापालिकेच्या हद्दीतील करसंकलन, पाणी पुरवठा काही विभागाच्या वसुलीचा ठेकाही येस बॅंकेला देण्यात आला. भाजप पदाधिका-यांच्या हट्टापाई महापालिकेतील कररुपी जनतेचा पैसा खासगी बॅंकाकडे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला. या निर्बंधांमुळे येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार असून महापालिकेला पैसे काढण्यास अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या येस बॅंकेतील ठेवीवर गंडातर आल्याने आता लेखा विभागाला खासगी बॅंका ऐवजी राष्ट्रीयकृत बॅंकाकडे ठेवण्याच्या विचाराधिन आहे. त्यानूसार आयुक्तांनी आरबीआयकडे पत्र व्यवहार करुन येस बॅंकेतील ठेवी परत मिळवण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. तसेच महापालिकेचे बँक ऑफ बडोदामध्ये देखील पैसे ठेवले आहेत.

येस बॅंकेने नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीची होणार चाैकशी

महापालिकेच्या विविध विभागातून दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातात. परंतू, महापालिकेने येस बॅंकेकडे विविध कर वसुलीचे काम दिले आहे. येस बॅंकेकडून खासगी एजन्सी नियुक्त करुन पालिका वसुलीचे काम केले जाते. मात्र, करसंकलन विभागातील मिळकतींचा सुमारे साडेतीन लाखाचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. शिवाय बॅंकेवर निर्बंध लादल्याने येस बॅंकेची वसुली थांबवून पर्यायी यंत्रणा उभी करण्यात आली. तसेच संबंधित व्यक्तीकडून वसुली देखील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अर्ज मागवूनच येस बॅंकेची नियुक्ती

पिंपरी चिंचवड महापालिकेचा विविध कर वसुली व सेवातून मिळणारे उत्पन्न हे ठेवी स्वरुपात बॅंकाकडे अल्प मुदतीत ठेवण्याचा प्रस्ताव आला. त्यानूसार जाहिरात देवून अर्ज मागविण्यात आले. तेव्हा ठेवीवर सर्वांधिक व्याजदर व सुलभ सेवा देण्यासाठी येस बॅंकेने कबूल केले. त्यानूसार बॅंकेची वित्तीय परस्थिती पाहूनच महापालिकेने करारनामा करुन सर्व वसुलीही त्याच्याकडे देण्यात आली. पालिकेच्या विविध बॅंकामध्ये सुमारे 4 हजाराच्या ठेवी असून त्या सुरक्षित आहेत. परंतू, आरबीआयने येस बॅंकेवर निर्बंध आणल्याने पालिकेकडून आरबीआयशी पत्र व्यवहार करुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे महापालिकेच्या ठेवी सुरक्षित राहतील, असे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button