breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शरद पवार आणि अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही – सुनेत्रा पवार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि आजोबा शरद पवार तसेच वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही, असा विश्वास त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापोडी येथे त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका माई काटे, महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, पार्थ हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू त्याला घरातूनच मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल, असं तो कदापी वागणार नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करतील, अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या, अस देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या.

महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकायला मिळाले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती, त्यामुळे पार्थला उमेदवारी देण्यात आल्याचंही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button