breaking-newsराष्ट्रिय

वाहतूक पोलिसाने केला खोटया पोलीस निरीक्षकाचा पर्दाफाश

वाहतूक पोलिसाच्या ताब्यातून गाडी सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करणे एका ५३ वर्षीय नागरिकाला चांगलेच महाग पडले आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. विनोदसिंह हरीसिंह राठोड असे आरोपीचे नाव आहे. विनोदसिंह यांनी अहमदाबादमधील प्रल्हाद नगर येथील मंदील चौकात चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केली होती. त्यावेळी डयुटीवर असणारे वाहतूक कॉन्स्टेबल रमेश जीवा हे बेकायद पद्धतीने पार्क केलेल्या गाडया उचलून रस्ता मोकळा करत असताना त्यांनी विनोदसिंह यांची गाडी उचलली.

हा प्रकार विनोदसिंह यांना समजताच त्यांनी मंदील चौकात धाव घेऊन वाहतूक पोलीस रमेश जीवा यांना धारेवर धरले. रमेश जीवा यांच्यावर दडपण आणण्यासाठी त्यांनी राणीप पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी केली. मी राणीप पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक असून व्ही.एच.राठोड आपले नाव आहे. तुम्ही माझी गाडी कशी उचलू शकता ? असा सवाल त्यांनी जीवा यांना विचारला.

जेव्हा मी त्यांना ३५० रुपये दंड भरण्यास सांगितला तेव्हा त्यांचा पार आणखी चढला. आपण पोलीस निरीक्षक असल्यामुळे आपल्याला दंड लागू होत नाही असे त्यांनी जीवा यांना सांगितले. या प्रकारानंतर जीवा यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन लावून सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठांच्या निर्देशावरुन त्यांनी राणीप पोलीस स्टेशनला फोन लावला.

तिथल्या पोलीस निरीक्षकांशी बोलताना व्ही.एच.राठोड नावाचा कोणी पोलीस निरीक्षक नसल्याचे त्यांना समजले. जेव्हा जीवा यांनी जाब विचारणाऱ्याला उलटे प्रश्न केले त्यावेळी विनोदसिंह यांनी त्यांची खरी ओळख सांगितली व पोलीस नसल्याचे कबूल केले. आयपीसीच्या कलम १७० आणि १८६ अंतर्गत विनोदसिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button