breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाकड पोलिसांकडून मोक्कातील आरोपी जेरबंद

पिंपरी – मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. तर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी अटक केली आहे. वाकड पोलिसांनी रतन रोकडे (वय २१ रा. रोकडे वस्ती, चिखली) असे मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील आरोपीला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. तर मंगेश नामदेव पालवे (वय२८, रा. मोरेवाडी, ता. मुळशी) या  पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कस्पटे वस्ती येथील कस्पटे चौकात वाकड पोलीस ठाण्यातील पथक क्रमांक १० आणि १७ कारवाई करत होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्काअंतर्गत कारवाई झालेला रावण साम्राज्य टोळीतील फरार आरोपी रतन रोकडे तेथे उभा असल्याचे दिसुन आले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.चौकशी करून तो मोक्काच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक केली. त्याच्यावर चिंचवड, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. देहूरोड पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. वाकड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button