breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

वयाच्या १०० व्या वर्षीही ‘हे’ आजोबा घरोघरी पोहोचवतात दूध

निरोगी शरीर असल्यानंतर वयाची शंभरी पार केल्यानंतरही व्यवसाय करता येतो याचे ज्वलंत उदाहरण पिंपरी-चिंचवड शहरातील मोहन नगर येथे पाहायला मिळत आहे. अण्णा अलंकार असे वयाच्या शंभरव्या वर्षी व्यवसाय करणाऱ्या आजोबांचे नाव आहे. तरुणांना लाजवेल अशी काम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांचा गवळीचा व्यवसाय असून ते घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम करतात. नुकताच त्यांचा १०० वा वाढदिवस धूम धडाक्यात पार पडला. अलंकार कुटुंबात ऐकून ३२ सदस्य आहेत.

अण्णा अलंकार यांचा जन्म ३ जानेवारी १९१८ ला पंढरपूरमध्ये झाला. १९७२ च्या दुष्काळात ते पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले असून त्यांच शिक्षण हे चौथी पर्यंत झालेलं आहे. वयाच्या तेराव्या वर्षांपासून गवळीचा व्यवसाय ते करतात. बारा मुलं-मुली, वीस नातवंड-पतवंड असा बत्तीस सदस्यांचा कुटुंब पाहण्याचा योग मिळणं म्हणजे परमेश्वराची लीलाच असल्याचं आण्णा सांगतात.

त्यांना तालीम खूप आवडायची त्यामुळे अद्यापही माझी तब्बेत ठणठणीत असल्याचे ते सांगतात. वयाच्या तीसव्या वर्षी माणूस मनाने आणि शारीरिक दृष्ट्या थकून जातो परंतु अण्णा मात्र अद्यापही मनाने तरुणच आहेत. त्यांची काम करण्याची ऊर्जा जबरदस्त आहे. ते सकाळी उठून गायीची धार काढत ग्राहकांना घरपोच दूध पोहोचवण्याचे काम करतात.

अण्णा शंभरी पार केल्यानंतर ही फिट आहेत. त्यामागचं कारण म्हणजे व्यायाम, सकस आहार आणि सुरुवातीपासूनच त्यांचा दिनक्रम. अद्यापर्यंत तरी अण्णा हे रुग्णालयात गेलेले नाहीत. विशेष म्हणजे चष्म्याविना ते पेपर वाचतात. स्वतःच्या हातांनी जेवण करतात. पायी चालत दूध विक्री करतात. गवळीचा व्यवसाय अन तालिमीत गाळलेला घाम यामुळं आज त्यांना कोणतही औषध घेण्याची गरज भासत नाही. त्यांचा हा तंदुरस्तपणा पाहून ग्राहक कौतुक करतात. तालीम करत असताना खारीक, खोबर,हे अन्नाचा डायट होता. पहाटे पाचला उठून तब्बल पाच ते सात किलोमीटर चालत जाऊन दूध विकलं आहे. जनावरांविषयी अण्णांना पहिल्यापासून खूप माया आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अण्णा आजही मोठ्या आत्मविश्वाने व्यसाय करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button