breaking-newsआंतरराष्टीय

‘या’ देशावर ढग चोरल्याचा इराणचा आरोप

तेहरान –  मौल्यवान वस्तू चोरीला जाणे सद्यकाळात सामान्य बाब ठरली असली तरीही बर्फ अणि ढगांच्या चोरीचा मुद्दा सामान्यांना अशक्यप्राय वाटणे स्वाभाविकच आहे. परंतु इराणमध्ये काही विपरितच घडले आहे. तेथील एका ब्रिगेडियर जनरलने इस्रायलवर स्वतःच्या देशाचे ढग आणि बर्फ चोरल्याचा आरोप केला आहे. इस्रायल इराणच्या हवामानासोबत छेडछाड करत असल्याने देशात पाऊस पडत नसल्याचा दावा या सैन्याधिकाऱ्याने केला.

इराणमध्ये होत असलेला हवामान बदल पाहता इस्रायलवरील संशय बळावला आहे. अन्य देशांच्या मदतीने इस्रायल इराणमध्ये पाऊस पडू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप इराणचे ब्रिगेडियर जनरल आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशनचे प्रमुख गुलाम रजा जलाली यांनी केला.

परंतु इराणच्या हवामान विभागाचे प्रमुख अहद वजीफे या दाव्याशी सहमत नाहीत. अशाप्रकारचे प्रश्न आणि आरोपांद्वारे उपाय मिळणार नाही, आम्ही आमच्या या संकटावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे वजीफे म्हणाले. ढग किंवा बर्फाची चोरी केली जाऊ शकत नाही. इराण दीर्घकाळापासून दुष्काळाला तोंड देत आहे. ही एक जागतिक समस्या असून केवळ इराणची नव्हे असे स्पष्टीकरण वजीफे यांनी दिले.

अफगाणिस्तान आणि भूमध्य समुद्रादरम्यानचा 2200 मीटरचा डोंगराळ भाग हिमाच्छादित असतो, परंतु असे इराणमध्ये घडत नसल्याचे जलाली यांनी सांगितले. परंतु इराणमधील एखाद्या अधिकाऱ्याने अन्य देशावर पाऊस चोरीचा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाश्चिमात्य देशांमुळे इराणमध्ये दुष्काळ पडला आहे. युरोपीय देश एका विशेष उपकरणाचा वापर करून ढगांना कैद करत असल्याचा दावा माजी राष्ट्रपती अहमदीनेजाद यांनी 2011 मध्ये केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button