breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्याच्या बदल्या

– महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा आदेश
– 10 उपअभियंता आणि 37 कनिष्ठ अभियंता अदला-बदल
 विकास शिंदे   
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील स्थापत्य विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या 10 उपअभियंता आणि 37 कनिष्ठ अभियंत्याची बदल्या करण्यात आल्या. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आदेश दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात ७ वर्षांपासून अधिक काळ असलेल्यांची माहिती मागविली होती. त्यामध्ये 46 विभागामध्ये एकूण 1767 अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, नगररचनाकार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक यांसारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून खुर्ची उबविणारे अधिकारी, कर्मचारी आहेत.
तसेच  लिपिक, वाहन चालक 7 वर्षांपासून ते 15 वर्षांपर्यंत एका विभागात कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक लिपिक निविदाप्रक्रिया व इतर महत्त्वाच्या जबाबदा-यांमुळे ठाण मांडून आहेत. तर, 28 वर्षांपासून एकाच शाळेत असणारे शिक्षक, 26 वर्षे एकाच रुग्णालयात असलेले वॉर्डबॉय,  4 वर्षे एका विभागात असलेले अनेक शिपाई, 31 वर्षे  सफाई कामगार, 23 वर्षे आया असे कर्मचारी असल्याचे आढळून आलेले आहे. त्या कर्मचा-यांच्या देखील लवकरच बदल्या करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या स्थापत्य विभागातील  दहा उपअभियंत्या विविध ठिकाणी बदली करण्यात आल्या. त्यामध्ये  उपअभियंता हनुमंत शिंदे ( फ क्षेत्रीय), विनायक माने ( क क्षेत्रीय), वैशाली ननावरे (पाणी पुरवठा व जलनिःस्सारण), प्रकाश साळवी (नगररचना), शिवाजी चाैरे ( अ क्षेत्रीय ), शहाजी गायकवाड ( फ क्षेत्रीय पाणी पुरवठा), राजेंद्र मोराणकर (पाणी पुरवठा व जलनिःस्सारण), संजय तुपसाखरे (झोनिपू), धनंजय गवळी (स्थापत्य), महेश बरीदे ( क क्षेत्रीय स्थापत्य) या ठिकाणी बदली करण्यात आली. तसेच केशवकुमार फुटाणे यांना स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार व ह क्षेत्रीय स्थापत्य विभाग सोपविला आहे.
याशिवाय महापालिकेतील 37 कनिष्ठ अभियंत्याचा विभाग बदलण्यात आला. यामध्ये प्रवीण धुमाळ ( बांधकाम विभाग), मनोज बोरसे ( ड क्षेत्रीय पाणीपुरवठा), अमर जाधव (बांधकाम विभाग), लक्ष्मण वायाळ (ह क्षेत्रीय), अमित दिक्षित (स्थापत्य), राहूल पाटील (ड पाणी पुरवठा), स्वप्नील शिर्के (ड स्थापत्य), रघुनाथ शेमले ( ब क्षेत्रीय पाणीपुरवठा ), अतुल जोशी ( स्थापत्य), चंद्रशेखर कुर्ले  ( फ क्षेत्रीय), सदाशिव बगली ( झोनिपु), अनिल इदे ( क क्षेत्रीय), विश्वनाथ राऊत (बांधकाम विभाग), रत्नाकर कुलकर्णी ( इ क्षेत्रीय), अभिमान भोसले (नगररचना), किरण अंदुरे ( क क्षेत्रीय), संदीप पाडवी ( जलनिःस्सारण), शिल्पा गोखले (ब क्षेत्रीय), शरद मोरमारे ( स्थापत्य), जयवंत रोकडे (ग क्षेत्रीय),  सचिन लोणे ( स्थापत्य), शैलेद्र चव्हाण (क क्षेत्रीय), निलेश दाते (नगररचना), शाम गर्जे (ह क्षेत्रीय), प्रशांत कोतकर (झोनिपू), दिनेश फाटक (इ क्षेत्रीय), संजय जाधव (बांधकाम विभाग), अभय कुलकर्णी ( फ क्षेत्रीय), मनाली स्वामी ( बांधकाम विभाग), मीनल दोडल ( अ क्षेत्रीय पाणी पुरवठा), अशोक मगर ( अ क्षेत्रीय स्थापत्य ), कविता माने ( फ क्षेत्रीय पाणी पुरवठा), जयकुमार गुजर (नगररचना), प्रकाश सगर (झोनिपू), आनंद नायडू ( नगररचना), जितेंद्र देवकर आणि अनिल काशिद (जलनिःस्सारण मुख्यालय) यांचा बदल्या करण्यात आल्या.
दरम्यान, उपरोक्त अधिका-यास बदलीचे ठिकाणी रुजू होण्यास तात्काळ कार्यमुक्ती करावी, तसेच त्यांनी बदली दिलेल्या विभागात 13 फेब्रुवारीपर्यंत रुजू होवून  रुजू झाल्याचा अहवालाची एक प्रत प्रशासन विभागाकडे सादर करावी, याशिवाय कर्मचा-यांनी आदेशाच्या दिनांकापासून 15 दिवसात कार्यभार हस्तांतर करुन तसा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना द्यावा, अन्यथा सदर कर्मचा-यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त हर्डिकर यांनी दिला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button