breaking-newsपुणे

‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी

पुणे –  ”पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे वाटत नाही.”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितले.

श्री शिर्डी साईबाबा देवस्थान वडमुखवाडी चर्होली आळंदी रस्ता येथे मंगळवारी (ता.16) श्री शिर्डी साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सवप्रसंगी (1918-2018) मोदी यांनी भेट दिली. त्यावेळी मोदी बोलत होते.

महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस कमी झाल्याने सध्या अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत महाराष्ट्र सरकारला सहकार्य करावे. मी जरी पंतप्रधानांचा भाऊ असलो तरी मीही एका सर्व सामान्य नागरिकाप्रमाणेच जीवन जगत आहे. आपल्या प्रमाणेच माझीही पंप्रधानाबाबत एक तक्रार आहे ती म्हणजे ते ”स्वतः साठी आणि आम्हा कुटुंबियांसाठी वेळ देत नाहीत. देशाला त्यांनी वाहून घेतले आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेले भारत स्वच्छता अभियानामुळे देश बदलत चालला आहे. हगणदारीमुक्त होत आहे.”

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button