breaking-newsराष्ट्रिय

मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं भाजपा नगरसेवकाचं कार्यालय

काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला असून आंदोलनाला हिंसक वळण लागताना दिसत आहे. एकीकडे पुण्यात बसची तोडफोड केल्याचं समोर आलं असताना मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दिंडोशीत भाजपा नगरसेवकाचं कार्यालय फोडलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याची सूचना केली असतानाही कार्यकर्ते रस्त्यावर हिंसा करताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे.

मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील अशी माहिती राज ठाकरे यांनी बैठकीनंतर जाहीर केलेल्या एका पत्राद्वारे दिली होती. त्याचबरोबर ‘भारत बंद’ला रस्त्यावर उतरुन मनसे कार्यकर्ते पाठिंबा देतील, पण याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नु

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button