breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानातील तिघांना अमेरिकेने घोषित केले जागतिक दहशतवादी

  • “लष्कर ए तोयबा’शी संबंध असल्याचा दावा 

वॉशिंग्टन – पाकिस्तानातील तिघांना अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. लष्कर ए तोयबाचा कमांडर अब्दुल रेहमान अल दाखिल हा या तिघांमधील मुख्य म्होरक्‍या आहे. त्याच्याव्यतिरिक्त हमीद उल हसन आणि अब्दुल जब्बार या दोघा अर्थ पुरवठादारांनाही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष गटाच्यावतीने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

अमेरिकेच्या “ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोल’च्या ट्रेजरी ऑफिसनेही लष्कर ए तोयबाचे आर्थिक जाळे उद्‌ध्वस्त करण्याच्या हेतूने या दोघांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. मुंबईवरील “26/11’च्या दहशतवादी हल्ल्यामागील संघटना लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी हे तिघेही संबंधित आहेत.

लष्कर ए तोयबाचा म्होरक्‍या अब्दुल रेहमान अल दखिल हा दीर्घकाळापासून अमेरिकेच्या विदेशी दहशतवाद्यांच्या यादीत होता. मुंबईवरील हल्ल्यामागेही त्याचा हात होता. 2004 मध्ये दाखिलला ब्रिटीश सैनिकांनी इराकमध्ये पकडले होते. त्यानंतर त्याला इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. 2014 मध्ये त्याला पाकिस्तानच्या स्वाधीन केले गेले. पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाल्यावर दाखिल पुन्हा एकदा लष्कर ए तोयबामध्ये सक्रिय झाला. 2016 मध्ये तो जम्मू भागासाठी “लष्कर’चा विभागीय कमांडर झाला. 2018 पर्यंत तो वरिष्ठ कमांडर म्हणून सक्रिय होता.

जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केल्यामुळे दाखिल आणि अन्य दोघांची सर्व बॅंक खाती निरुपयोगी होतील. तसेच त्यांच्याबरोबर बॅंकांच्या माध्यमातून कोणताही आर्थिक व्यवहार केला जाऊ शकणार नाही. अमेरिकेच्या अधिकार कक्षेत असलेल्या मालमत्तांबाबतही काहीही व्यवहार केला जाऊ शकणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button