breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीतील झोपडपट्टीधारकांचे होणार पुनर्वसन ; महापालिका सुमारे पावणे दोन हजार घरे बांधणार

शहर सुधारणा समितीच्या विशेष सभेत मान्यता 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पंतप्रधान आवास योजनेंतंर्गत पिंपरी चिंचवड महापालिकाच्या वतीने दापोडीतील जयभीम नगर परिसरात झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणार आहे. तब्बल 36 इमारतीत एकूण 7 हजार 143 सदनिका बांधण्यास एक हजार 757 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या सुधारित खर्चाच्या उपसुचनेला शहर सुधारणा समितीने मान्यता दिल्याचे माहिती शहर सुधारणा सभापती सीमा चाैगुले यांनी दिली. 

महानगरपालिका शहर सुधारणा समितीची विशेष सभा पार पडली. या सभेत महापालिका हद्दीत घोषित व स्वयंघोषित सुमारे 72 झोपडपट्टया आहेत.  महापालिकेने झोपडपटट्यांसाठी मेसर्स एम.एम. प्रोजेक्‍ट कन्सल्टंटस्‌प्रा. लि. यांनी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प सादर करून त्याचे सादरीकरण केले आहे. मात्र, महापालिका हद्दीत प्रायोगिक तत्वावर क्‍लस्टरवाईज झोपडपट्टयांची विभागणी करून प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याकरिता अन्य झोपडपट्टयांच्या पुनर्वसनाकरिता या सल्लागाराने सुमारे 3000 हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. या सल्लागाराने क्‍लस्टर एकमध्ये भाटनगर पुनर्निमाण प्रकल्प व क्‍लस्टर दोनमध्ये दापोडी येथील सिध्दार्थनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरेवस्ती या झोपडपटट्यांचा समावेश आहे. दुस-या क्‍लस्टरमधील झोपडपटट्यांचा पुनर्वसन अहवाल सादर करण्याचा प्रस्तावासह 1 हजार 957 कोटींच्या सुधारित खर्चाची उपसूचना शहर सुधारणा समितीमध्ये मंजुर करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये लभार्थींना 269 चौ. फूटांची सदनिका दिली जाणार आहे. यामध्ये विक्रीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय त्यामोबदल्यात कोणताही टिडीआर दिला जाणार नाही. या प्रकल्पासाठी गुगल मॅपनुसार एकूण 6 हजार 693 झोपडपट्टया आढळल्या आहेत. तर विकसकाला एकूण 36 गृहप्रकल्पांमधून 7 हजार 143 सदनिका बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 296 चौ फूट असले, तरीदेखील विक्रीसाठी 300 ते 800 चौ. फूट क्षेत्रफळ उपलब्ध असणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत 910 कोटी असून, सुधारित किंमत1 हजार 757 कोटी एवढी धरण्यात आली आहे.

या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे कामाच्या खर्चाचे स्वरुप  
पुनर्वसन/ पुनर्विकासाकरिता – 800 कोटी
सुविधांकरिता- 16 कोटी
तात्पुरता निवारा- 23 कोटी
रहिवासी सदनिका- 760 कोटी
विक्रीसाठी सदनिका- 81 कोटी
मुलभूत सुविधा- 77 कोटी
जागा मालकाकडून जमीन विकत घेणे- 200 कोटी
एकूण प्रकल्प किंमत- 1957 कोटी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button