breaking-newsपुणेमहाराष्ट्र

झाडे तोडण्याचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे येणार

महामेट्रोची तयारी : सुधारणा करण्याची सदस्यांची मागणी

पुणे – मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या वृक्षांच्या पुनर्रोपण आणि वृक्षतोड या विषयाला अनुसरून महामेट्रोने वृक्षप्राधिकरण समितीकडे सर्व बाबींची पूर्तता करून प्रस्ताव दाखल करण्याला महामेट्रोने तयारी दर्शवली आहे. शनिवारी झालेल्या समितीच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला.

हे काम सार्वजनिक असल्याचे कारण देत वृक्षप्राधिकरण समितीकडे अधिकृत प्रस्ताव सादर करण्याला “महामेट्रो’ टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. तसेच शनिवारी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनोज पाचपुते, शिल्पा भोसले, दीपाली धुमाळ, सुजाता शेट्टी, संदीप काळे, हाजी गफूर पठाण, धनंजय जाधव, आदित्य माळवे, द. स. पोळेकर या सदस्यांनी आक्षेप घेतला.

मेट्रोने आजपर्यंत दिलेले सर्व प्रस्ताव सुधारित करून विहित नमुन्यामध्ये सादर करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. बाधित वृक्षाचे 1:3 प्रमाणात रोपण आणि पुनर्रोपण करणे, अनामत रक्कम, तज्ज्ञ सदस्य अहवाल, पाहणी अहवाल, नकाशे, छायाचित्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता करत प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

तज्ज्ञ समिती सदस्याचा राजीनामा 
“महामेट्रो’कडून प्राधिकरणाची आणि महापालिकेची दिशाभूल केल्याचा आरोप माजी उद्यान अधीक्षक भानुदास माने यांच्यावर करण्यात आला होता. माने हे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वृक्ष प्राधिकरणात तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी या पदाचा राजीनामा वृक्षप्राधिकरण समितीकडे सादर केला. समितीने तो मंजूर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button