breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापुरात साजरा होतोय झाडांचा वाढदिवस

कोल्हापूर – शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन लावलेल्या छोट्या मोठ्या रोपांचा उद्या रविवारी (दि. ३०)  सकाळी ७ वाजता वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

पर्यावरण रक्षण व संवर्धन हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ते जपले पाहिजे ही संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने शहरातील रंकाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित पुढाकार घेत रंकाळा तलाव परिघातील अनेक उद्यानांमध्ये अनेक छोट्या मोठ्या रोपांची लागवड तसेच वृक्षांच संगोपण केले आहे.

यासाठी काही सुजान नागरिक नियमित पणे त्या रोपांची अगदी मुलांप्रमाणे काळजी घेणे, निगा राखणे, त्यांना पाणी देणे असे काम करीत असतात. आज त्यातील अनेक रोप ही वाढली आहेत. हा वृक्षप्रेमांचा उपक्रम कायमस्वरुपी पुढे राहावा, यातूनच निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी यांचा एकोपा राहावा, जनजागृती व्हावी हाही उद्देश डोळ््यासमोर ठेवून उद्या रंकाळा तलाव येथे सकाळी ७ वाजता वृक्षांचा वाढदिवस हा उपक्रम करण्यात येत आहे.

रंकाळा तलाव परिसरात नियमित रोपांची लागवड करणे, समाजहित तसेच पर्यावरण जपण्यासाठी छोटे मोठे उपक्रम राबविण्यासाठी येथील राजेश कोगनुळकर, प्रा. मोहनराव मतकर, उद्धव जाधव, दिनकर कमळकर, ए. के. कुलकर्णी तसेच अशोक जाधव अशी मंडळी यासाठी विशेष मेहनत घेत असतात. यांना परिसरातील वृक्षप्रेमी, नागरिक हेही साथ देत असतात. या उपक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button