breaking-newsराष्ट्रिय

केरळला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, राहुल गांधींचे मोदींना आवाहन

धुंवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ संपूर्ण केरळमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात ३२४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमधील या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. केरळमध्ये उद्भवलेल्या भयानक पूरस्थिती बाबत ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर मोदी यांना आवाहन केले आहे.  ‘प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केरळमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे लाखो लोकांचे जीवन अडचणीत सापडले आहे. कृपया आपण अजून वेळ वाया न घालवता केरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे’ असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

Rahul Gandhi

@RahulGandhi

Dear PM,

Please declare floods a National Disaster without any delay. The lives, livelihood and future of millions of our people is at stake.

दरम्यान आज शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री वियजयन यांच्यासोबत हवाई मार्ग केरळच्या पूरग्रस्त भागाची पाहणी. याआधी त्यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत केरळला ५०० कोटी रूपयांची मदत जाहिर केली. याशिवाय पूरातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. याआधी राजनाथसिंह यांनी केरळला १०० कोटींची मदत जाहिर केली होती.

वाचा – Kerala floods : इतर राज्यांची केरळच्या मदतीसाठी धाव; निधीसह अन्न आणि वस्तूंचा पुरवठा

केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळ बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु आहे.

वाचा – Kerala Floods: केरळमध्ये एका दिवसात १०६ जणांचा मृत्यू, पंतप्रधान आज पाहणी करणार

केरळमध्ये १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये पूरानं गेले आठ दिवस थैमान घातलं असून देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर लाखाच्या पुढे लोक बेघर झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले असून त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

वाचा – Kerala Floods: केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूर, ८२ हजार लोकांना वाचवले, ३२४ जणांचा मृत्यू 

देशभरातून केरळसाठी मदतीचे हात पुढे येत आहेत.  हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी आज शनिवारी १० कोटींची मदत जाहीर केली आहे. केरळमध्ये आलेला महापूर हा १०० वर्षांतील सर्वांत भयानक महापूर असल्यानेच नमूद करत पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी १० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून ५ कोटींचा निधी मुख्यमंत्री मदत निधीसाठी तर उर्वरित ५ कोटी रुपये अन्न आणि आवश्यक वस्तूंच्या रुपात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारकडून १० कोटी, तेलंगणाकडून २५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केरळमधील पुरग्रस्तांसाठी देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button