breaking-newsपुणे

कात्रज परिसरात दहशत माजवणारी गणेश लगस टोळी तडीपार

पुण्याच्या कात्रज, अरण्येश्वर, संतोषनगर, एलआयसी कॉलनी, तावरे कॉलनी, सच्चाईमाता नगर या परिसरात शस्त्रांचा धाक दाखवून व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे वसूल करणारी, गणेशोत्सवाच्या काळात जबरदस्तीने वर्गणी गोळा करणा-या गणेश लगस टोळीच्या सात जणांना पुणे पोलिसांनी दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

गणेश लक्ष्मण लगस (वय-43, रा.संतोषनगर, कात्रज, पुणे) हा या टोळीचा मुख्य सुत्रधार आहे. त्याच्यावर स्वारगेट, दत्तवाडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

त्याचे साथीदार गजानन शिवानंद स्वामी (वय-29), निखील दिनेश चव्हाण (वय-23, किरण संदीप वाडकर (वय-25), ऋषिकेश सिध्दार्थ नांदुरे (वय-23), किरण प्रल्हाद मोरे (वय-25) आणि विजय लक्ष्मण लगस (वय-46) या सर्वांना सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस कर्मचारी असगर सय्यद, कल्पेश बाबर यांनी तडीपार प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्वांना पुणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र आणि पुणे जिल्हा हद्दीबाहेर दोन वर्षासाठी तडीपार केले.

तडीपार केलेल्यांवर स्वारगेट, दत्तवाडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ या पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोड्याची तयारी करणे यासारखे गंभीर गुन्हे आहेत. यापूर्वीही 2000 साली टोळीप्रमुख गणेश लगस याच्यावर स्वारगेट पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button