breaking-newsमनोरंजन

‘उरी’च्या पदरात १०० कोटींचं यश, ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ला टाकलं मागे

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट नवीन वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने ‘तनु वेड्स मनु रिटर्न’चाही रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण चित्रपट ठरल्याचं म्हणता येईल. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत या चित्रपटामध्ये भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.२० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर केवळ दोन दिवसामध्ये या चित्रपटाने २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या या चित्रपटाने थेट १०० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे साऱ्यांच्याच नजरा उंचावल्या आहेत.

taran adarsh

@taran_adarsh

Days taken to reach ₹ 💯 cr by medium-budget films…: Day 10: Day 11: Day 16: Day 17: Day 17: Day 25
Nett BOC. India biz.

565 people are talking about this

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचं २५ कोटी रुपयांचं बजेट होतं. मात्र या चित्रपटाने अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये बजेटच्या रकमेची वसुली केली होती. त्यानंतर चित्रपटाची लोकप्रियता आणि विकी कौशलच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचा चित्रपटाकडे असलेला कल वाढत गेल्याचं पाहायला मिळालं.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘उरी’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न’च्या आकडेवारी सह १०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या चित्रपटांची यादीदेखील जाहीर केली. यात कंगनाच्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ने ११ दिवसांत १०० कोटींची कमाई केली. तर ‘स्त्री’ने १६ दिवसात १०० कोटी कमावले. त्याप्रमाणेच ‘राजी’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांनी १७ दिवस, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ने २५ दिवसात १०० कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या तुलनेत ‘उरी’ने केवळ १० दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे हा चित्रपट येत्या आठवड्याभरात १५० कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा चित्रपट असून पुढील काही दिवसामध्ये कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button