breaking-newsमनोरंजन

आलियाच्या सेल्फिमध्ये चुकून आला रणबीर

आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी सध्याची सर्वात फेमस बॉलिवूड जोडी आहे. बहुतेकवेळेस हे दोघे एकत्रच आढळून येतात. हे दोघेही सध्या बल्गेरियामध्ये आहेत. तिथे त्यांच्या आगामी “ब्रम्हास्त्र’चे शुटिंग सुरू आहे. शुटिंगच्या फावल्या वेळात आलियाने तिथे खूप मस्तीही केली. या मौजमजेचे फोटोही ती नियमितपणे इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. अशाच एका वेळी ती बल्गेरियातील एका मोठ्या उद्यानात गेली होती. तिने आपल्या गर्ल गॅंगबरोबर एक सेल्फीही घेतली आणि हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअरही केला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये आलियाने “पुनीत सैनी आणि प्रियांका’ आपल्या मैत्रिणींची नावेही टाकली आहे. पण तेवढ्यात तिच्या लक्षात आले असावे की सेल्फीमध्ये मागे हिरवळीवर उभा असलेला रणबीर कपूरही दिसतो आहे. तिने कॅप्शनमध्ये लगेचच रणबीरचे नावही जोडून टाकले. “ब्रम्हास्त्र’मध्ये आलिया आणि रणबीर कपूरशिवाय महानायक अमिताभ बच्चन हे देखील महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहेत. रणबीरसाठी “संजू’च्या यशाच्या बरोबर “ब्रम्हास्त्र’ही यशस्वी होणे तितकेच महत्वाचे आहे कारण आलिया आणि रणबीरच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. त्याअगोदर या दोघांचा एकत्र असा हा महत्वाचा सिनेमा असणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button