breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आरटीई प्रवेशाची तिसरी लॉटरी आज

पुणे – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या 25 टक्‍के राखीव जागांची तिसरी लॉटरी बुधवारी किंवा गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी हारुन आत्तार यांनी सांगितले. लॉटरीची सर्व तयारी झाली असून एक दोन दिवसांत ती काढली जाईल असेही आत्तार यांनी सांगितले.
आरटीईअंतर्गत आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या फेरीत 10 हजार 656 प्रवेश पूर्ण झाले आहेत; तर दुसऱ्या फेरीतील काही प्रवेश अद्यापही बाकी आहेत. यंदा प्रवेशासाठी कोणत्याही शाळांकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली गेली नाही. त्यामुळे प्रवेश सुखकर झालेत. मात्र काही पालकांना प्रवेशाचे एसएमएस न मिळाल्याने त्यांना याबाबत ऊशीरा माहिती मिळाली. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा ऊशीर झाला. त्यानुसार आता एक दोन दिवसांत सर्व प्रवेश पूर्ण होतील त्यानंतर लगेचच तिसरी फेरी सुरू होईल. ज्या पालकांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही त्यांनी आता तिसऱ्या फेरीत आपला नंबर टाकून प्रवेश मिळाला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button