breaking-newsमनोरंजन

अर्जुन कपूर झाला 33 वर्षाचा अर्जुन कपूर झाला 33 वर्षाचा : हॅपी बर्थडे

आज बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस आहे. अर्जुन कपूर हा प्रसिद्ध निमार्ते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. आज अर्जुनने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर अर्जुनने केवळ वडील बोनी कपूर यांनाच नाही, तर आपल्या दोन्ही सावत्र बहिणी जान्हवी व खुशी यांनाही सावरले आणि त्यांच्या पाठीशी खंबीर आधार बनून उभा राहिला. अर्जुनची एक सख्खी बहीण आहे, अंशुला. अंशुला अर्जुनचा जीव की प्राण आहे. अर्जुन ११ वर्षांचा असताना अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरे लग्न केले होते. अर्जुनवर याचा मोठा परिणाम झाला.

अर्जुनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वप्रथम ‘कल हो ना हो’ आणि त्यानंतर ‘सलाम-ए-इश्क’ या फिल्म मध्ये दिग्दर्शक निखिल आडवाणींना सहाय्य केले होते. ‘वाँटेड’ आणि ‘नो एन्ट्री’मध्ये त्याने सहनिर्मात्याची भूमिकाही बजावली. अर्जुनने अभिनेता म्हणून ‘इशकजादे’मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली .यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राने काम केले.  ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ‘औरंगजेब’ मध्ये सर्वप्रथम अर्जुनने दूहेरी भूमिका केली होती. यानंतर ‘गुंडे’ मध्ये रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासोबत काम केले. अर्जुनने चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित ’२ स्टेट्स’, ‘ हाफ गर्लफ्रेंड ‘ या मध्ये काम केले आहे. शिवाय सोनाक्षी सिन्हासोबत होम प्रोडक्शनच्या ‘तेवर’मध्येही काम केले आहे.
त्याच्या येणाऱ्या भविष्यकाळातील चित्रपटांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button