breaking-newsमनोरंजन

अभयच्या चित्रपटात अमेरिकी ललना

हिंदी चित्रपटांमध्ये परदेशी ललनांना घेण्याचा ट्रेंड तसा जुना आहे. या विदेशी सौंदर्यवतींचा चित्रपटाच्या यशासाठी किती फायदा होतो किंवा आजवर किती चित्रपटांना त्याचा फायदा झाला याचा शोध घेतल्यास मिळणारं उत्तर नकारात्मक आहे; मात्र तरीही हा मोह निर्माते-दिग्दर्शकांना आवरता येत नाही.

कित्येकदा कथानकात दम नसल्यामुळेही परदेशी कलाकारांना घेऊन चित्रपटाची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो. मागील काळात अशा अनेक विदेशी सुंदरींनी रूपेरी पडद्यावरून भारतीय सिनेरसिकांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. आता अभय देओलच्या “जंगल क्राय’ या चित्रपटातून आणखी एक परदेशी सुंदरी झळकणार आहे. तिचं नाव आहे एमिली शाह.

मूळची भारतीय वंशाची असणारी ही अमेरिकन अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. एमिली कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील मीडिया मॅनेजमेंट शाखेची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी तिने “फास्ट अँड फ्युरियस 7′ “कॅप्टन अमेरिका’, “रन ऑल नाईट’ आणि “जर्सी बॉईज’ यासारख्या प्रमुख हॉलीवूड चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. “जंगल क्राय’ चित्रपटाचे दिग्दर्शन सागर बेलारी यांनी केले आहे.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतातील जंगलांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 12 युवा आदिवासी तरुणांच्या रग्बी संघाची ही कहाणी आहे. या संघाने 14 वर्षांखालील रग्बी विश्‍वचषकात अनवाणी पायांनी खेळून सर्वांनाच अचंबित केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button