breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत वृक्षतोडप्रकरणी उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखेंना आयुक्तांची नोटीस 

इंद्रायणीनगरमध्ये वृक्षतोड केल्याने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – इंद्रायणी परिसरात पालिका ठेकेदार व अधिका-यांनी संगनमताने विनापरवाना वृक्षतोड करण्यात आली. याविषयी शहरातील पर्यावरण प्रेमींनी पुराव्यानिशी ही बाब आयुक्तासह वृक्ष प्राधिकरण समितीतील नगरसेवकांच्या निर्देशनास आणून दिली.  याबाबत आज ( सोमवारी दि. 22 ) वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत नगरसेवकांनी मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना जाब विचारला. याप्रसंगी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरसेवकांनी त्या अधिका-याला निलंबन करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी सुरेश साळुंखे यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

इंद्रायणीनगर येथील संजीवनी कॉलनीत (रविवारी दि.21) अवैध वृक्षतोड झाली. ही गाडी पर्यावरणप्रेमींना पकडल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा छाटणीची परवानगी नसल्याचे समोर आले. या वाहनाची  तक्रार पोलीस कंट्रोल रुमला करण्यात आली. त्यामुळे वाहनचालक टेम्पो सोडून पसार झाला. उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पाहणी केल्यानंतर ठेकेदाराला परवानगी फांद्या छाटण्यासाठी असताना त्याने झाडे तोडल्याचे निदर्शनास आले.

या सगळ्याबाबत पर्यावरण प्रेमींकडून पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्य़ात आली. ही बाब सोमवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत नगरसेवक तुषार कामठे, विलास मडिगेरी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ऩिदर्शनास आणून दिली. तसेच, मडिगेरी यांनी मुख्य उद्यान अधिक्षक साळुंखे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्याला कामठे यांनी अनुमोदन दिले.  दरम्यान, बैठकीत साळुंखे यांनी या प्रकरणावरून वाद घातला. या प्रकरणी आयुक्त हर्डीकर यांनी साळुंखे यांना नोटीस बजावत असल्याचे सांगितले. त्यांचा खुलासा आल्यानंतर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिल्याचे वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य क तुषार कामठे यांनी सांगितले.

 

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी चिंचवडमधील नगरसेविकेच्या नावाचा गैरवापर

चिंचवड परिसरातील एका झाडाच्या फाद्या काढण्यास सांगितले असता तेथील नागरिकांच्या सांगण्यावरुन संबंधित ठेकेदाराने संपुर्ण झाडच तोडले. याबाबत महापालिकेच्या वृक्ष  अधिक्षकांना वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत जाब विचारण्यात आला. त्यावर तेथील नगरसेविकेने सांगितल्याने ते झाड तोडले असे त्यांनी मिटींग मध्ये सांगितले. ही गोष्ट नगरसेविकेच्या कानावर आल्यावर त्यांनी त्या अधिका-याला बोलावून घेतले. तसेच प्राधिकरणाच्या सदस्यांना बोलावून त्यांनी खरे काय आणि खोट काय याविषयी खुलासा करण्याचा दम भरला. त्यावर त्या अधिका-यांने माझ्यावरील आयुक्तांकडून होणारी निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी मी खोटं बोलल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे वृक्ष व उद्यान विभागातील अधिकारी कारवाई टाळण्यासाठी नगरसेविकेच्या नावाचा गैरवापर करु लागल्याचे उघड झाले आहे. यापुढे माझ्या नावाचा गैरवापर केल्यास तुमचे काही खरे नाही, लक्षात ठेवा असा इशारा नगरसेविकेने देताच त्या अधिका-यांनी त्यांची माफी मागितली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button