breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेच्या रेट्यामुळे झालेल्या पोलीस आयुक्तालयाचे श्रेय भाजपने लाटले – आमदार चाबुकस्वार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ज्याप्रमाणे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत नागरिकांचे प्रश्न मांडले. तसे मी सुध्दा पिंपरी विधानसभेतील नागरिकांचे प्रश्न मांडणार होतो. परंतु, मला बोलण्याची संधी दिली नाही. एवढा अवमान करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी शिवसेनेने आजवर पाठपुरावा केला. आमच्या रेट्यामुळेच शहरात स्वतंत्र आयुक्तालय झाले. त्याचे श्रेय भाजपने लाटले असल्याची खंत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

विविध विकास कामांचे ई-भूमीपूजन आणि पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) झाले. या कार्यक्रमात शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार हे देखील त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडण्यासाठी अवरजून उपस्थित होते. मात्र, त्यांना बोलण्याची संधी दिली नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

चाबुकस्वार म्हणाले की, शहरामध्ये 40 टक्के झोपडपट्टी भाग आहे. या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. हे पुनर्वसन झाले नाही. तर शहराची स्मार्ट सिटी होणार नाही. हे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे होते. पोलीस आयुक्तायाची मागणी शिवसेनेने केली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा देखील केला होता. त्याचे श्रेय भाजपने लाटले आहे. पोलीस आयुक्तालयानंतर आमची शहरासाठी स्वतंत्र कारागृहाची मागणी आहे. त्यासाठी देखील मी स्वतः पाठपुरावा करत आहे. हे खटले निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व्हावे, यासाठी देखील राज्याच्या कायदा विभागातील अधिकारी आणि नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. हे प्रश्न शिवसेना मांडत अली असून त्याचे श्रेय मात्र, भाजप घेत असल्याची खंत चाबुकस्वारांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button