breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोपखेल रस्ता प्रश्न, पुणे जिल्हाधिका-यांना लष्कराला जागा देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  बोपखेल रस्त्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्या जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा लष्कराला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत लष्कराला जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लष्कराला कोणती जागा उपलब्ध करून द्यायची याबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना शुक्रवारी (दि. ११) आदेश दिले आहेत.

 पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना सध्या पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु, नदीवरील पूल आणि रस्त्यासाठी पुन्हा लष्कराच्याच चार एकर जागेचे संपादन करावे लागणार आहे. त्यामुळे लष्कराने आधी या  जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार २५ कोटी ८१ लाख रुपये देण्यास महापालिका राजी झाली.

 मात्र लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच महापालिकेकडे मागणी केली आहे. त्यामुळे बोपखेलवासीयांचा रस्त्याचा वनवास आणखी लांबला. लष्कराच्या मागणी राज्य सरकारच्या पातळीवर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ढिम्म अधिकारी बोपखेलच्या प्रश्नांवर तातडीने हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना बोपखेलचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले.

 मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी हलले आणि शुक्रवारी (दि. ११) मंत्रालयात तातडीची बैठ घेतली. या बैठकीला मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पुणे, नाशिक, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, पुणे महापालिका नगररचना विभागाचे सहायक संचालक, खडक कॅन्टोन्मेंट बोर्ड, नाशिकमधील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button