breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा धक्का! शुबमन गिल पहिल्याच सामन्याला मुकणार?

World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ येत्या रविवारी पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहे. दरम्यान, या पुर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा सलामवीर शुबमन गिल हा सामना मुकण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुबमन गिल चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर सरावासाठी उतरलाच नाही. त्याच्या डेंग्युच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तो सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

शुबमन गिलची आज पुन्हा काही चाचण्या केल्या जाणार आहेत. जर त्या चाचण्यांमधून अपेक्षित निष्कर्ष आले नाहीत, तर मात्र शुबमन गिल रविवारच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन किंवा के.एल. राहुल कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीसाठी खेळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button