काळेवाडी येथे शस्त्रे बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/GANG-ARREST-PCMC.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
तलवार आणि कोयते अशी घातक शस्त्रे बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 6) दुपारी सव्वापाच वाजता काळेवाडी फाटा येथील खेतेश्वर मंदिराजवळ करण्यात आली.
सागर उर्फ बबल्या बापू खताळ (वय 23, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी फाटा, थेरगाव), समीर नवाब शेख (वय 24, रा. गुजर नगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अजय फल्ले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथील खेतेश्वर मंदिराजवळ दोघेजण शस्त्रे घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी सागर आणि समीर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार आणि कोयते अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे. बेकायदेशीर शस्त्र न बाळगण्याबाबत पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे आरोपींनी उल्लंघन केले. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.