breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#waragainstcorono:कंटेन्मेंट झोनच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक बारामतीत दाखल

मुंबई : देशातील कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथकं पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, केंद्र सरकारचं एक पथक महाराष्ट्रात दाखल झालं आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रभावित असलेल्या क्षेत्रात जाऊन त्यांचा पाहाणी दौरा सुरू आहे. या दौऱ्यात केंद्रीय पथक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढवा घेत आहे. आज हे केंद्रीय पथक बारामतीत दाखल झालं असून बारामतीतील कंटेन्मेंट झोनची पाहणी सुरू आहे.

बारामती जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सध्या शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करीत आहेत. याची पाहणी करण्याकरिता केंद्रीय समिती गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आली आहे. आज हे पथक बारामतीत आले असून शहरातील जे भाग सील करण्यात आले आहे किंवा कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. याची या पथकाकडून बारकाईने पाहणी केली केली जात आहे. तसेच शहरातील सिल्व्हर जुब्ली रुग्णालय, मेडिकल कॉलेज या ठिकाणी ही पाहणी करणार आहेत.

बारामतीत कोरोनाचे सात रुग्ण आढळले आणि त्यातील एकाचा मृत्यूही झाल्यानंतर राजस्थानमधील भीलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर बारामतीत बारामती पटर्न राबविला जात आहे. यामध्ये ज्या उपाय योजना आहेत,  त्या कितपत परिणामकारक ठरल्या याची ही पाहणी आणि माहिती केंद्रीय पथकाकडून घेतली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button