breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#WAR AGAINST CORONA: पुण्यात चौथा बळी…नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन!

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असतानाच पुणे शहरात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. भवानी पेठेतील एका 52 वर्षीय रुग्णाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आल्याने आज (रविवार) दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित चौथ्या मृत व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार होता. त्यातच कोरोनाचीही लागण झाली होती. त्याच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर कोरोनाबाधित मृतांच्या यादीत या रुग्णाचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे. निगेटीव्ह रिपोर्ट आल्याने रुग्णालयातून घरी सोडलेल्या एका 60 वर्षीय महिलेचा शुक्रवारी तिच्या घरातच मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा तिच्या घशातील द्राव चाचणीसाठी पाठवला असता, ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आज (रविवारी) निष्पन्न झाले. त्या पाठोपाठ चौथ्या मृत्यूची बातमी येऊन धडकल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पुण्यात एका 53 वर्षीय पुरुष व 46 वर्षीय महिलेचा यापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता आता आज आणखी दोघांची भर पडल्याने शहरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 4 झाली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 88 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 60 रुग्ण हे पुणे शहरातील तर 21 जण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. या व्यतिरिक्त 7 जण ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत पुणे शहरातील 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आणखी पाच रुग्णांची 14 दिवसांनंतरची चाचणी निगेटीव्ह निष्कर्ष देणारी ठरली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या टप्प्यातील 12 ही रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. पिंपरीत नवीन सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button