breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Virat Kohli : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड!

२०१९ नंतर विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतक

virat kohli : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने २४० चेंडूत शानदार शतक ठोकले आहे. त्याचे हे कारकीर्दीतील ७५ वे शतक आहे. कसोटीमध्ये हे त्याचे २८ वे शतक आहे. शतकांच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी भारताचा सचिन तेंडूलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. २०१९ नंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतक झळकावल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विराट कोहलीने ७५ आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी ५५२ इनिंग्ज खेळल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने ५६६ इनिंग्ज खेळल्या आहेत. विराटने सचिन तेंडुलकरचा हा विक्रिम मोडला आहे.

१९९३ नंतर प्रथमच भारताच्या १ ते ५ विकेट्सने ५०+ धावांची भागीदारी केली. १९९३ मध्ये इंग्लंडविरूद्ध नवज्योत सिंग सिद्धू, मनोज प्रभाकर, विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरूद्दीन व प्रविण आम्रे यांनी हा पराक्रम केला होता. आजच्या कसोटीत रोहित, गिल, पुजारा, कोहली, जडेजा व भरत यांनी हा पराक्रम केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button