breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा त्याला..’; उदयनिधी स्टॅलिन यांचं वादग्रस्त विधान

मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपसह अनेक नेत्यांनी निषेध नोंदवला आहे.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्यापेक्षा त्या रद्दबातल केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. सनातन धर्माला नुसता विरोध करू नये, त्यापेक्षा तो मूळापासून नष्ट करायला हवा. सनातन हे संस्कृत नाव आहे. हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.

हेही वाचा – ‘लाठीचार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी करा’; राज ठाकरेंचं आंदोलकांना आवाहन

मी सनातन धर्मामुळे त्रस्त असलेल्या अपेक्षित समाजाच्या वतीने बोलत आहे. माझ्या वक्तव्याबाबत मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार सामाजिक न्याय राखण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी संघर्ष करत राहील. अशा भगव्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही पेरियार, अण्णा आणि कलैगनार (करूणानिधी) यांचे अनुयायी आहोत आणि सामाजिक न्याय राखण्यासाठी नेहमीच लढा देऊ, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button