breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘संजोग वाघेरे खासदार’ मावळात वाघेरेंच्या विजयाचे बॅनर!

पिंपरी | लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. तर लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. निकालाला २० दिवस बाकी असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत.

मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे-पाटील यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. ‘खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित…घासून नाही ठासून हाणली…मा. श्री संजोग वाघेरे पाटील यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..’ असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.

हेही वाचा     –      राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय? शरद पवारांचा खोचक टोला 

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेतही टक्केवारी कमी आहे. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी अंदाज लावत वाघेरे यांना एक लाख ७० हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button