breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

सैन्य माघारीच्या मुद्द्यावर अमेरिकेचे अध्यक्ष ठाम

नवी दिल्ली |

अफगाणिस्तानात तालिबानने अपेक्षेपेक्षा फार लवकर सत्ता काबीज केली तरी तेथून सैन्य माघारीच्या निर्णयावर आपण ठाम आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊस येथून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, अफगाणिस्थान सरकार तालिबानच्या दबावामुळे नाट्यमयरीत्या कोसळले असून तेथील भयानक परिस्थितीला अमेरिका जबाबदार नाही. तेथे काही लोक विमानांच्या पंखांना पकडून लोंबकळताना दिसल्याची दृश्ये प्रसारित झाली आहेत. अफगाणिस्तानातील दृश्ये काळीज गोठवून टाकणारी आहेत. पण अमेरिकी सैन्य माघारीसाठी यापेक्षा कुठली वेगळी वेळ चांगली होती असे वाटत नाही, सैन्य माघारीच्या निर्णयावर आपण ठाम आहोत. त्याच्या परिणांची जाणीव असल्यानेच आम्ही आपत्कालीन उपाययोजना केल्या होत्या.

आपण अमेरिकी लोकांच्या पाठीशी आहोत. अमेरिकेचे समर्थन असलेले सरकार व लष्कर यांनी तालिबानला सत्ता घेऊ दिली. अपेक्षेपेक्षा जास्त लवकर तालिबानने हे करून दाखवले. अफगाणिस्तानच्या नेत्यांनी पलायन केले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे तालिबानने कब्जा करण्यापूर्वीच तेथून पळून गेले होते. बायडेन म्हणाले की, अफगाणी दले लढण्याची क्षमता दाखवत नसताना तेथे अमेरिकी सैन्याला मरू देणे आम्हाला योग्य वाटले नाही. अफगाण लष्कर तालिबानपुढे कोसळले. त्यांनी प्रतिकारही केला नाही. गेल्या आठवड्यातील घटनांमुळे अफगाणिस्तानातून अमेरिकेने लष्कर मागे घेतल्याबाबत नाराजी व्यक्त केली जात असली तरी त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. अध्यक्ष बायडेन हे त्यांची सप्ताहाअखेरची सुटी सोडून कॅम्प डेव्हीडहून व्हाइट हाऊसमध्ये परत आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button