Uncategorizedताज्या घडामोडीपुणे
काश्मीरमधील जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे यासाठी झटणारे योगेश चिथडे यांचे निधन
पुणेः सियाचिनमधील; तसेच काश्मीरमधील जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे, यासाठी तिथे ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे योगेश चिथडे (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यामागे आई-वडील, बहीण, पत्नी सुमेधा, मुलगा हृषीकेश असा परिवार आहे. चिथडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना मदत करणे, वीरनारींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. स्वतःच्या आर्थिक योगदानाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून निधी जमवून त्यांनी सियाचिन; तसेच कूपवाडा येथे लष्करासाठी दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह तत्कालिन लष्करप्रमुखांनीही त्यांना गौरवले होते.





