Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहली; नागपूरच्या तरुणाला शहर सोडावे लागले!

नागपूरः भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या २२ वर्षीय युवकाला शहर सोडावं लागल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहल्यानंतर त्याला सातत्याने धमक्या येत होता. त्यामुळं धास्तावलेल्या तरुणानी सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करत माफी देखील मागितली. मात्र, तरीही धमक्या सुरुत होत्या. अखेर या तरुणाला कुटुंबीयांनी शहर सोडून जाण्याचा सल्ला दिला.

सोशल मीडियावरील पोस्टमुळं या तरुणाच्या जीवाला धोका असल्याचं त्याच्या कुटुंबीयांकडून सांगितलं जातं. पोलिसांच्या कारवाईनंतरही त्याचे कुटुंबीय घाबरलेले आहेत. मुलगा १५ दिवस झाले अद्याप घरी परतला नाहीये. तर, कुटुंबातील इतर सदस्यही काम असेल तरच घराबाहेर पडतात व वेळेत घरी परततात. अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणं टाळतात.

आम्ही जेव्हा खूपच गरज भासते तेव्हा घराबाहेर पडतो. अलीकडेच उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळं आम्ही घाबरलेलो आहोत. पोलिसांची फौज तैनात असली तरीही आम्हाला सुरक्षित वाटतं नाही. घटनेच्या आधीच मी माझ्या लहान भावाकडून मोबाइल काढून घेतला होता. त्यामुळं तो नक्की कुठे गेलाय हे आम्हालाही माहित नाहीये. त्याला शहरात परत आणण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत, अशी भावना तरुणाच्या मोठ्या भावाने व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घराखाली सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नंदनवनच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही आपत्तकालीन परिस्थितीत कुटुंबीयांना आपला फोन नंबर दिला आहे. सीपी अमितेश कुमार यांच्यासह कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी झोनल डीसीपी नूरुल हसन आणि अतिरिक्त सीपी नवीनचंद्र रेड्डी करत आहेत.

दरम्यान, भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट केल्यामुळे अमरावतीतील एका डॉक्टरसह दहा जणांनाही धमकी देण्यात आली होती. त्यांनी माफीनामा दिल्यानंतर प्रकरण निवळल्याचे समजते. दरम्यान, मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणात शनिवारी नागपुरातून अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधारास ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली असल्याचे तपासात पुढे आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button