TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरूवारी राज्याच्या विविध भागात पाऊस पडेल. अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता असून या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र, या दिवशी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत १२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे.

मुंबईचं हवामान
मुंबईत गुरूवारी कमाल तापमान ३३ आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असेल. यावेळी आकाश ढगाळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत ३१ वर नोंदवला गेला आहे.

पुण्याचा हवामान अंदाज
पुण्यात कमाल तापमान २९ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल तर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत ५५ वर नोंदवला गेला आहे.

आज नागपूरचे हवामान
नागपुरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहिल. यावेळी ढगाळ वातावरण असेल तर काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. अशात हवा गुणवत्ता निर्देशांक ७७ आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.

नाशिकचे आजचे हवामान
नाशिकमध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील ११२ आहे.

औरंगाबादचे हवामान
औरंगाबादमध्ये कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यावेळी ढगाळ वातावरण राहिल तर हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत ९१ आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी ही बातमी दिलासादायक असणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button