स्वभाव बदलो वा ना बदलो… दृष्टी बदलली की सृष्टी बदलते…-कांचन कदम-सुतार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Shrushti.jpg)
जगणाऱ्याला जीवन कळते… पळणाऱ्याला नाही
।महाईन्यूज । सुनील आढाव।
आपला स्वभाव बदलतो. अवघ्या मानव जातीचा अविभाज्य गुणधर्म म्हणजे प्रेम. शाश्वत प्रेम…. प्रेम प्रकरणातील प्रेम नव्हे, सात्विक, शाश्वत प्रेम प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असते, नसानसांत असते. कधी ना कधी ते बाहेर येतेच. हे प्रेम कधी कधी जगण्याला पंख देते तर कधी जगणेच समृद्ध करते. सगळ्यांना एका कक्षेत बघायला शिकवते… आणि याच प्रेमाला जेव्हा अध्यात्माची जोड मिळते. तेव्हा जगण्याला पंख फुटतात. एव्हढेच काय तर जगणे खरेच समृद्ध होते. म्हणून माणसाचा स्वभाव बदलो वा ना बदलो मात्र दृष्टी बदलली की सृष्टी आपोआप बदलते… हे विचार आहेत, एका आदर्श शिक्षिकेचे. ज्ञानरुपी शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून ज्ञानाची कवाडे खुल्या करणाऱ्या, भारताचे भविष्य घडविणाऱ्या कांचन कदम-सुतार यांच्या विचारपुष्पांवर टाकलेला हा प्रकाशझोत… खास रसिक वाचकांसाठी…
हीरा बनाया है ईश्वर ने हर किसी को…
पर चमकता वही है जो तराशने की हद से गुज़रता है…!! असे सांगताना कांचन म्हणतात, जगणाऱ्याला जीवन कळते… पळणाऱ्याला नाही
श्री. धुंदिबाबा विद्यालय विद्यानगर या शाळेतील 2003 साली इयत्ता दहावीच्या वर्गातून बोर्डाच्या परीक्षेत कांचन कदम या प्रथम क्रमांकाने पासआऊट झाल्या होत्या. कांचन यांना 78.93 इतके गुण मिळालेत. त्या शाळेत तसेच केंद्रातही प्रथम आल्या. पुढे कांचन यांनी इयत्ता बारावीनंतर डीएड केले. 12 जून 2022 रोजी श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगरमध्ये 2003 सालच्या बॅचने स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या आयोजन टीममध्ये कांचन या हिरीरीने सहभागी होत्या. तसेच या कार्यक्रमाच्या नियोजनातही कांचन यांचा सिंहाचा वाटा होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे कांचन यांचे विचार आणि आचार ऐकायला, अनुभवायला मिळाले.
बारावीनंतर त्यांनी तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील अद्यापक विद्यालय आंबेवाडी, डीएड न्यू कॉलेजमधून डीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे महाराष्ट्रभर शिक्षक सेवक मेगा भरतीमधून त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी अर्ज केला. सातारा जिल्ह्यातून त्या 2009 साली एकमेव उमेदवार असल्यामुळे ताबडतोब शिक्षक सेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
मुळातच प्रतिभावंत असलेल्या कांचन यांना साक्षात सरस्वती प्रसन्न असल्यामुळे त्यांचा हा खडतर प्रवास त्यांनी लिलया पार केला. डीएड शिक्षण त्यांनी हॉस्टेलमध्ये राहून पूर्ण केले. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळे डीएडच्या शिक्षणासाठी त्यांनी 15 हजार रुपयांचे कर्ज काढून दोन वर्षांचा हा कोर्स पूर्ण केला. 15 हजार रुपयांचे कर्ज दोन वर्षासाठी म्हणजे वर्षाला 7500 रुपये तर महिन्याला जेमतेम 625 रुपये खर्च करून त्यांनी या कठिण काळावर मात केली. एव्हढी काटकसर करून कांचन या डीएड पासआऊट झाल्या. कांचन यांनी सातारा जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरल्यामुळे डिएडनंतर त्यांना तीनच महिन्यात नोकरी मिळाली. अतिशय खडतर प्रवासाबद्दल सांगताना त्या अनेकदा भाऊक देखील झाल्या होत्या. 15 हजार रुपयांच्या कर्जाचे 60 हजार रुपये कर्ज झाले. नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी त्याची व्याजासह परतफेडही केली. कष्टप्रद शैक्षणिक प्रवासामुळे त्या खरेच ताऊन सुलाखून निघाल्याचेही त्यांच्या परिपक्व विचारांतून जाणवले.
कांचन यांच्या प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला तर इयत्ता पाचवीपर्यंत त्या पहिल्या पाचमध्ये असायच्या. माझ्या माहितीनुसार त्यावेळी इयत्ता पाचवीमध्ये पहिला क्रमांक निलेश चंद्रकांत शिंदे, सोनगाव, दुसरा क्रमांक प्रविण शिवाजी शिंदे, सोनगाव तिसरा क्रमांक रणजीत शिवाजीराव शिंदे, सोनगाव तर चौथा क्रमांक अनुप्रिता उत्तम चिकणे, व पाचवा क्रमांक कांचन श्रीरंग कदम यांचा असायचा. मात्र इयत्ता सहावीपासून कांचन अभ्यासात चमकू लागल्या. इयत्ता सहावीपासून ते दहावीपर्यंतचा त्यांचा शैक्षणिक प्रवास मी जवळून अनुभवला. सहावी ते दहावी कांचन या प्रथम क्रमांकानेच पासआऊट झाल्या आहेत.
इयत्ता आठवीमध्ये कांचन यांना 85 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी त्या वर्षीचा 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक येवले सरांनी कांचन यांच्या हस्ते करावयाचा निर्णय घेतला होता. कारण कांचन यांनी शाळेतील सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे योजिले होते. त्यानुसार विद्यालयात कांचन याच सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यिनी म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
कांचन यांच्या स्वभावाबद्दल अनेकांचे गैरसमज आहेत. शैक्षणिक कारकिर्दीत कांचन यांचा पूर्ण फोकस हा अभ्यासावरच असायचा. त्यामुळे त्या जास्त कुणामध्ये मिसळायच्या नाहीत. इतर मुलींप्रमाणे कधीही त्या गप्पागोष्टीत रमल्या नाहीत. अत्यंत शिस्तबद्ध आणि स्ट्रेट फॉरवर्ड जीवन जगल्या. त्या फार कमी बोलायच्या. त्यामुळे त्या कोपीष्ट, इगोष्टीक आहेत. पर्यायाने असा समज बहुदा इतरांचा व्हायचा. परंतु, त्या मितभाषी होत्या. फार कमी बोलायच्या. मात्र वेचक बोलायच्या. त्यांच्या या मितभाषी स्वभावामुळे सुरुवातीला असेही वाटायचे की त्या अखडू स्वभावाच्या असणार, मात्र जेव्हा त्यांच्या स्वभावाबद्दल अनुभव यायला लागला, तेव्हा खरेच कांचन किती वैचारीक आहेत, प्रगल्भ आहेत हे समजले. किती श्रेष्ठ मितभाषी आहेत, किती शिष्ठ आहेत याची जाणीव झाली. या दरम्यान कांचन यांच्या इयत्ता पहिलीपासून 12 वी पर्यंत शिकणारी मैत्रिण अश्विनी भोईटे हिच्याशी कांचन यांच्या स्वभावाविषयी चर्चा केली. अश्विनी म्हणाली, कांचन हे असे अजब रसायन आहे. परीस स्पर्श व्हावा आणि इतरांचे जीवन बहरावे. तसे कांचन हिच्या सहवासातून मला उर्मी मिळाली. ती अभ्यास करायची तर आम्ही मुली मस्ती. कांचन अनेकदा आम्हाला म्हणायची तुम्ही तरी अभ्यास करा किंवा मला तरी करू द्या. आम्ही मनापासून अभ्यास केला नाहीच. पण कांचनने मात्र मनापासून अभ्यासही केला आणि आम्हालाही करू दिला. कांचन अखडू होती. किंवा तिचा स्वभाव वाईट होता असे अजिबात नाही. परंतु आम्ही वाह्यात कुणाशीही बोलल्याचे तिला आवडत नसे. ती नेहमी आम्हाला म्हणायची कुणासोबतही गप्पा मारत जाऊ नका.
कांचन या कॉलेजात जाताना अश्विनी हिचा घट्ट हात पकडून जायच्या. का तर गर्दीची त्यांना भिती वाटायची. अश्विनी आणि कांचन यांचे बॉण्डिंग अजूनही चांगले. आहे. त्यांच्या दोघींचा सुसंवाद कायम टिकून आहे. हेच या वरून अधोरेखित होते. एक आदर्श मैत्रीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणावे लागेल.
कांचन चर्चेदरम्यान बोलातना म्हणाल्या. प्राथमिक ते माध्यमिक शाळेत शिकताना मी कधीच कुणाला प्रतिस्पर्धी मानले नाही. गुरुजनांनी शिक्षणाचे पेरलेले माणिक मोती पटापट टिपायचे. आणि सर्वांगिण आत्मविकास तसेच व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल यावर मी जास्त भर द्यायचे.
मित्रा, माणूस आजन्म विद्यार्थीच असतो रे. फक्त माणसांमध्ये शिकण्याची जिज्ञासा असावी. कारण शिकण्याची वृत्तीच माणसाला परिपक्वतेच्या कोंदणाचे शाश्वत अधिष्ठान बहाल करत असते. कांचन या फार छान बोलतात. त्या बोलता बस ऐकावे आणि ऐकतच रहावे, असे वाटते… कांचन जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या मुखातून अमृताची पताका, आनंदाचा कंद जन्म घेतोय की काय? थोडक्यात काय तर त्यांच्या मुखातून बाहेर येणारे प्रत्येक वाक्य हे सुविचार भासते. केवळ भासते नाही तर ते असतेच. याला मुख्य कारण म्हणजे कांचन यांची भाषा. शुद्ध विचारांचे कोंदण त्या भाषेला लाभलेले आहेच. कारण भाषा हीच आपले जगणे व्यक्त करते. एवढेच काय तर आपले वागणे, बोलणे, चालणे व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम भाषा असते. आणि मराठी भाषेबद्दल म्हणाल तर आपल्या मराठीची श्रीमंती, समृद्धी अपरंपार आहे. त्यामुळे एकूणच कांचन यांचे व्यक्तीमत्त्व खरेच समृद्ध आहे.
आता हा बदल त्यांच्यामध्ये कसा घडला, त्या म्हणतात की साधनेमुळेच घडले. योगसाधना माणसाला आतून बाहेरून बदलण्यास भाग पाडते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुलींना पर्यायाने महिला वर्गाला, जीवन जगताना असंख्य समस्या भेडसावतात. त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. त्यांना धैर्य, आधार देण्याचे काम आपल्या हातून व्हावे. कदाचित त्यामुळे इतरांच्या जीवनाला आधार देणारे नवचैतन्य, त्यांच्या दृष्टीकोनाला वर्तमानाचे आकलन, भविष्याची स्वप्ने देण्याचे महान पुण्यकार्य तरी किमान आपल्याकडून व्हायला हवे. याच प्रेरणेतून कदाचित अबलांना जीवनाच्या अंधाराला चिरुन पुढे जाण्याची उर्मी मिळेल. थोडक्यात बघता बघता एखाद्या सुज्ञ महिलेने अनेक महिलांसाठी, तमाम स्त्री वर्गासाठी कमालीचा उर्जास्त्रोत नक्कीच बनायला हवे. मित्रा, महिलांसाठी, समाजासाठी असे काहीतरी अचाट काम करायला मला आवडेल.
सध्या कांचन यांनी अध्यात्मिक साधनेद्वारे जगण्याचे अधिष्ठान अंगिकारले आहे. अध्यात्मिक गुरू श्री. श्री रविशंकर यांच्या अध्यात्मिक विचारांच्या अधिष्ठानावर विराजमान होऊन वाटचाल करताहेत. हे सांगताना त्या म्हणतात मित्रा, तुलाही अध्यात्माची गरज आहे. तू प्रतिभावंत आहेसच. परंतु, मनःशांतीसाठी प्रत्येकाने अध्यात्म अंगिकारलेच पाहिजे. मन:शांती मिळवण्यासाठी ध्यान, योग यांची आवश्यकता आहे. निर्भेळ आनंद मिळवण्यासाठी ध्यानाचा मार्ग अवलंबल्यास मन, भावना, चित्त आणि वृत्तीचा समतोल साधता येतो, मी म्हटले आता तुम्हीच व्हा मग माझ्या अध्यात्मिक गुरू. मला चालेल. त्यावर कांचन नम्रपणे म्हणाल्या, मी एव्हढी मोठी नाही रे मित्रा.
पुढे चर्चेदरम्यान मी त्यांना म्हटले की, तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदी लवकरच पोहोचायचे आहे. तर म्हणाल्या, मित्रा, विद्यादानात जो निर्भेळ आनंद आहे तो कशातच नाही. यावरून मला उमगले. जेव्हा जेव्हा जिंगदी में ट्रेस आता हैं… तेव्हा मी माझ्या मुलीच्या शाळेत जातो. त्या मुलांमध्ये रमतो. कारण ती निरागस, निष्पाप मुले बघताच मनातील ताण-तणाव कापसासारखा उडून जातो. हे खरे आहे. कांचन यांना तर हा निर्भेळ आनंद दररोज अनुभवायला मिळतो आहे.
मी म्हटले आपल्या सोबतचा तो इयत्ता पाचवीमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी मित्र सध्या दिशाहीन जीवन जगतोय. व्यसनाधिन झाला आहे. यावर कांचन यांनी फार मार्मिक टिपण केले. म्हणाल्या, तो तसा माझा भाऊच. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही पटले नाही. शेवटी त्याच्याशी बोलणेच बंद केले.
हा पण मी त्याला अधूम मधून अजूनही जीवनाचे गमक पटवून देत असते.
रोज घेतली तरीही त्याला
मदिरा कळली नाही…
मदिरा कळली विकणाऱ्याला
मदिरा कळली विकणाऱ्याला
पडणाऱ्याला नाही…
मित्रा, तुला सांगू का ? आय एम फुलफिल… ही पूर्णत्वाची जी भावना असते ही घातक असते… आपण जर पूर्णत्व स्वीकारले तर आपल्या विकासाच्या शक्यता खतम होतात. म्हणून जीवन में थोडा एम्टी रहना जरुरी हैं… आपल्याला वाटते आपण खूप मोठे आहोत. आएम फुल फिल वगैरे…
थोडा एम्टी रहना बहुत जरुरी है…
तुम्ही कधी भरू शकता…?????
भरण्याच्या शक्यता केव्हा असतात?????
जेव्हा तुम्ही थोडे खाली होता…
निचे आते हो जब आप…
मला नक्कीच पूर्णत्व प्राप्त नाही. मान्य आहे. परंतु, मी समाधानी आहे. माझ्या कुरुपतेमुळे किंवा मी दिसायला एव्हढी सुंदर नसल्यामुळे मला कोणी पसंद करत नव्हते. लग्नाचे वय उलटूनही मला जोडीदार मिळत नव्हता. अखेर एका फौजीने मला सहचारिणी म्हणून स्वीकारले. आता माझे सगळे एकदम उत्तम चालू आहे. आमचा सुखनैव संसार चालू आहे. आमच्या संसाराच्या वेलीवर दोन चिमण्यांचा किलबिलाट सुरू आहे. मी परिपूर्ण नाही मात्र समाधानी निश्चितच आहे.
अजून एक, महत्त्वाचे जीवनात थोडं थोडं का होईना चालत राहिलं पाहिजे… कारण एका ठिकाणी साचून राहिलेलं पाणीसुद्धा सडू लागते…
एका जागी थांबून थांबून,
डबके होईल पाणी
मग काय करायचे कुठे थांबायचे….
मित्रा,
थांबायाचे आहे तर मग
थांबायाचे आहे तर मग
समुद्र होऊन थांबू…
थांबायाचे आहे तर मग
समुद्र होऊन थांबू…
मित्रांनो, खरे तर हे कांचन यांचे हे सद्विचार आहेत…
त्या म्हणाल्या,
मित्रा,
जे सरते ते भरते
तरीही सरते म्हणूनी भरते
जे सरते ते भरते
सरण्याचे भय भरलेल्याला
सरणाऱ्याला नाही….
मित्रा, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही….
जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही…
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही….
जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही…
ताऱ्यांमधले अंतर सोडा,
माणसातले मोजा
ताऱ्यांमधले अंतर सोडा,
माणसातले मोजा
जवळीकतेची गरज माणसा…
ग्रह-ताऱ्यांना नाही…
कोण हारतो, कोण जिंकतो,
चिंता हवी कशाला,
चिंता याची बघणाऱ्याला
लढणाऱ्याला नाही…
जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही…
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही…
गहराईला सलाम माझा…
गहराईला सलाम माझा…
खळखळणाऱ्याला नाही
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही….
मित्रा,
वेल म्हणाली कळीस बाई,
इतुके असुदे ध्यानी
लाख दिवाणे फुलणाऱ्याला
गळणाऱ्याला नाही…
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही….
मित्रा तुला ठाऊक असेलच
सत्य तुक्याचे बुडले नाही…
सत्य तुक्याचे बुडले नाही…
जनगंगेच्या डोही
सत्य तुक्याचे बुडले नाही…
जनगंगेच्या डोही
गाथा कळली तरणाऱ्याला
बुडणाऱ्याला नाही…
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही….
मित्रा,
शांत राहण्या शक्ती लागे
क्रोधीत होणे सोपे,
शांत राहण्या शक्ती लागे
क्रोधीत होणे सोपे,
बुद्ध कळाला
कळणाऱ्याला
छळणाऱ्याला नाही…
जात्यामध्ये जीव देऊन घास मुखी जो देतो…
त्या दाण्याला जीवन कळते.
जात्यामध्ये जीव देऊन घास मुखी जो देतो…
त्या दाण्याला जीवन कळते.
मित्रा, त्या दाण्याला जीवन कळते
दळणाऱ्याला नाही…
जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही…
जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्या नाही….
सुनील आढाव
पत्रकार
संपर्कसूत्र ः 8830448394