प्रभाग क्रमांक ८ मध्ये विलास मडिगेरी यांचा प्रचारदौरा उत्साहात
मिशन–PCMC : भारतीय जनता पार्टीची प्रचारात आघाडी

पिंपरी-चिंचवड : इंद्रायणीनगर–भोसरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने सुरू असलेला प्रचार सध्या जोरात सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भाजप-आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत आहेत.
या प्रचारदौऱ्याचे नेतृत्व भाजपचे उमेदवार विलास मडिगेरी करत असून, त्यांनी आतापर्यंत प्रभागात केलेल्या विविध विकासकामांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. रस्ते विकास, डांबरीकरण व मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी मडिगेरी यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका रहिवाशांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.
प्रचारदौऱ्यात भाजप-आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत व सुशिक्षित उमेदवार (अ) डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे, (ब) नम्रता योगेश लोंढे, (क) निलम शिवराज लांडगे आणि (ड) विलास हनुमंतराव मडिगेरी यांना नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजप उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद

सेक्टर २ मधील श्री समर्थ कॉलनी ते श्री तिरुपती बालाजी चौक येथे करण्यात आलेले डांबरीकरण, सेक्टर ३ मधील हॉटमिक्स पद्धतीने झालेले रस्त्याचे काम, तसेच सेक्टर ४ मधील महाराज चौक ते गायत्री कुंज परिसरातील रस्ते दुरुस्ती आणि आरटीओ कॉर्नर ते स्नेहदीप सोसायटी दरम्यान करण्यात आलेले डांबरीकरण ही महत्त्वाची विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
भाजपच्या पॅनलने विलास मडिगेरी यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही प्रभागाच्या विकासासाठी कार्यरत राहावे व प्रभाग अधिक सुंदर व सुव्यवस्थित करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप-आरपीआय (आठवले) आघाडीला बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




