Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedराष्ट्रिय
Video: पाच महिन्याच्या पाळीव कुत्र्याला पट्ट्याने मारलं, कंपनीने थेट त्याला
नोएडा येथील सोसायटीमध्ये एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला त्या कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. कारण, त्या व्यक्तीने आपल्या घरातील पाच महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला पट्ट्याने जबर मारहाण केली होती. प्राणीप्रेमींकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली गेली.
या घटनेचा व्हिडिओ त्याच सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीने शूट केला आणि आयटी कंपनी असणाऱ्या कॉग्निझंट Cognizant या कंपनीला ट्विटरवर टॅग करून शेयर केला.
यानंतर जे झाले ते खूप महत्त्वाचे होते. त्या कंपनीने तात्काळ यावर पाऊले उचलत त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.