breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज ठाकरे यांना पुन्हा उद्धव ठाकरेंनी हिणवले… म्हणाले, केमिकल लोचा..!

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आहे. दुसरीकडे अनेक कायदेतज्ज्ञांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसेल, असं ठामपणे सांगितलं आहे. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होण्यासंदर्भात चर्चा सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू, असं भाष्य केलं. राज ठाकरेंच्या या मतावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना खोचक प्रतिक्रिया दिली. केमिकल लोच्या… या शब्दाचा पुनरुच्चार करत त्यांनी राज ठाकरेंना हिणवलं.

मुंबईतील काळाचौकी येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालं. शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी तसेच शेकडो शिवसैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं. भाजपवर तुफान टोलेबाजी करत युतीचा इतिहास सांगितला. शिवसेनेशी कशी दगेबाजी झाली, हे सांगण्याचा प्रयत्न केला तर बंडखोरांना ऑफर देण्याऱ्या राज ठाकरेंना देखील त्यांनी अनुल्लेखाने हिणवलं.

बंडखोरांना कुठल्यातरी एका पक्षात जावंच लागणार.. ते कुठल्या पक्षात जाणार? काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे (राज ठाकरेंचा उल्लेख टाळत)…, असं उद्धव ठाकरे हसत हसत म्हणाले. तेवढ्यात खालून शिवसैनिकांमधून केमिकल लोच्या… केमिकल लोच्या असे आवाज आले. उद्धव ठाकरेंनी देखील शिवसैनिकांच्या सुरात सूर मिसळून “किती जणांचा केमिकल लोच्या झाला असेल ते सांगता येत नाही”, असं हसत हसत म्हणाले. यावेळी त्यांनी मनसे किंवा राज ठाकरे यांचा उल्लेख टाळत त्यांना अनुल्लेखाने मारलं.

राज ठाकरे बंडखोरांच्या विलिनिकरणावर काय म्हणाले होते?

४० आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं. इतके आमदार पक्षात आले तर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं का? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्यासाठी आधी मनसैनिक. बाकीचे नंतर, असं मनसे उत्तर राज यांनी दिलं.

उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर तुफान हल्लाबोल
शिवसेनेला फोडण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले, पण आता शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न आहे. पण शिवेसेनेची पाळेमुळे एवढी घट्ट आहेत की यांच्या चार पिढ्या जरी आल्या तरी शिवसेना संपणार नाही. ती प्राणपणाने लढत राहिल. भाजपला शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचंय. पण त्यांना सांगू इच्छितो, बाळासाहेबांचा फोटो न लावता मतं मागून दाखवा, निवडून येऊन दाखवा. बंडखोरांनी आपल्या आई-वडिलांसोबत राज्यात सभा घ्याव्यात, त्यांच्या नावावर मतं मागावीत. मला वाटतं, मराठी माणसांमध्ये आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा डाव आहे. भाजपला माहिती नाही, त्यांनी कुणाशी पंगा घेतला आहे. शिवसैनिक सामान्य पण त्यांची ताकद असामान्य आहे. ज्यांना शिवसेनेने मोठं केलं तेच शिवसेना गिळायला निघाले आहेत. भाजपला स्वत:ला मुंबईवर ठसा उमटावयचा आहे. ज्यांना शिवसेनेने मोठं केलं तेच शिवसेना गिळायला निघाले आहेत, पण शिवसेना त्वेषाने लढेल आणि बंडखोरांना गाडेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button