Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

अहमदगनर जिल्ह्यातील भंडारदरा कळसुबाई परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा बुडून मृत्यू

अहमदनगर : पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात अनेक जण पर्यटनसाठी बाहेर पडत असतात. पर्यटनाला गेल्यानंतर पुरेशी काळजी न घेतल्यानं अनेकदा दुर्घटना घडत असतात. अहमदगनर जिल्ह्यातील भंडारदरा कळसुबाई परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधून दोन पर्यटक पर्यटनासाठी आले होते. भंडारदरा परिसरात फिरल्यानंतर सायंकाळच्या सुमारास कळसुबाईकडून भंडारदरा येथे निघाले होते. मात्र, वाहनचालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं त्यांची कृष्णवंती नदीच्या पात्रात बुडाली. यामध्ये दोघा पर्यटकांचा मृत्यू झाला.

नेमका कसा घडला अपघात?
कळसूबाई भंडारदरा मार्गावरील पेंडशेत फाट्याजवळ एका वळणावर कारचालकाला अंदाज आला नाही. त्यामुळं त्यांची क्रेटा ही कार नदीमध्ये बुडाली. या वाहनापाठोपाठ आलेल्या एका युवकानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, तो देखील नदीच्या पाण्यात वाहून गेला.

स्थानिक युवकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं कार बाहेर काढली. जो युवक वाहून गेला होता त्याचा मृतदेह देखील थोड्या अंतरावर आढळून आला.

दोघांची ओळख पटली

या अपघातात मृत्यू झालेले दोघे जण हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील ताड पिंपळगाव मधील रमाकांत प्रभाकर देशमुख आणि सिल्लोड तालुक्यातील पालोद गावच्या अरिष प्रभाकर पालोदकर यांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आलेलं नाही.

पावसाळ्यात पर्यटनाला गेल्यावर काळजी घेण्याची गरज

नाशिक जवळील साल्हेरला काल मालेगावहून एक पर्यटकांचा गट आला होता. साल्हेरवाडीकडून वर जाताना शेवटच्या दरवाजातून त्याच्यापैकी एक जण खाली पडला. या दरवाजाच्या पायर्‍या सरळ असल्यानं तिथं संततधार पाऊस सुरु होता. पाय घसरुन खाली पडलेल्या व्यक्तीचं जागीच निधन झालं. आणखी एक व्यक्ती काल दरीत कोसळला होता. त्या दोघांचे मृतदेह स्थानिक नागरिकांना बाहेर काढून मालेगावला नेले होते. पावसाळ्यातील पर्यटनावेळी काळजी न घेतल्यानं दुर्घटनांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं पावसाळ्यात पर्यटनाला गेल्यावर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button