Uncategorized

भोसरीत पैसे वाटप करताना तिघांना रंगेहात पकडले!

प्रभाग क्रमांक 6 मधील घटना : भोसरी पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादीचे उमेदवार प्रियांका लांडे यांच्या पतीचा प्रताप

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग 06 मधील निवडणुकीदरम्यान मतदान प्रभावित करण्यासाठी पैशांचे वाटप करणाऱ्या तीन जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, डेमो इव्हीएम मशीन, मतदार स्लीप्स आणि ट्रॅव्हल्स ऑफीस रजिस्टर जप्त करण्यात आले आहे.

एफ.एस.टी पथकाच्या भरारी पथक प्रमुख कमलेश बबन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 9.30 वाजता भोसरीतील न्यू शंभुराजे ट्रॅव्हल्स ऑफीस समोर छापा टाकण्यात आला. पोलिसांना माहिती मिळाली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या तर्फे मतदारांना पैसे वाटप केले जात आहेत.

हेही वाचा –  राजमाता जिजाऊ यांच्या ४२८व्या जयंतीनिमित्त ‘अणवाणी पायाने मशाल दौड’

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा एफ.आर.आय. नॉ.: 58/20261 दाखल केला आहे. घटनेत ताब्यात घेतले गेलेले आरोपी हे: कमलेश बबन बोचरे (वय 43, धंदा- मजुरी), संजय उत्तमराव आमले (वय 46, धंदा- ट्रॅव्हल्स व्यवसाय), ओम संजय आमले (वय 18, विद्यार्थी) यांच्याकडे 75,070 रुपये रोख रक्कम, 500 रुपयांच्या नोटांचे बंडल, डेमो इव्हीएम मशीन, 35 मतदार स्लीप्स आणि 140 पानांचा रजिस्टर जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या पंचनाम्यात हे सर्व मुद्देमाल साठवून ठेवण्यात आला आहे.

तक्रारदार कमलेश बबन सांगळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 06 मधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार प्रिंयका मयुर लांडे यांच्या पती मयुर लांडे यांनी पैशांचे वाटप करण्यासाठी त्यांना निर्देश दिले होते. पोलिसांनी पंचासमक्ष चौकशी केली असता आरोपींनी या व्यवहाराची कबुली दिली. भोसरी पोलीस स्टेशनच्या तपासीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button