अभिजीत बिचुकलेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरतात. नगरसेवक पदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निमित्त आहे ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या बिचुकलेंचा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. त्यांच्या बाजूला तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे तर, दुसरीकडे तत्कालीन गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील आहेत.
या सर्व प्रकरणावरती अभिजीत बिचुकले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “काही नालायक लोकांनी अशा पद्धतीने फोटो व्हायरल करून मुख्यमंत्रीपद आणि माझा अपमान केला आहे. त्यामुळे फोटो व्हायरल करणाऱ्यांना शोधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी. मी हे सहन करणार नाही. हा फोटो बिग बॉसमधील आहे,” असे स्पष्टीकरण बिचुकलेंनी दिलं आहे.