Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील करोना स्थिती चिंता वाढवणारी; ४ महिन्यानंतर पुन्हा ओढावली ‘ही’ स्थिती

मुंबईः मुंबई शहरात रविवारी जवळपास १०० करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे. गेल्या चार महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. मुंबईतील ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे.

गेले काही दिवस उंचावत चाललेला मुंबईतील करोनाच्या रुग्णवाढीचा आलेख रविवारीही वाढीचाच राहिला. मुंबईत रविवारी १,८०३ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली असून, चाळीस वर्षांखालील दोन रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी दर हा सध्या ११ टक्के आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मुंबईचा रुग्णदुप्पटीचा दर वाढून ५१३ दिवस झाला आहे.

रविवारी करोनामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांची संख्या वाढून ती १११ इतकी झाली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. आत्तापर्यंत ४२५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खाटांचा वापर २ टक्क्यांहून अधिक असल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सहा रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. तर, दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. या रुग्णांना दीर्घकालीन आजार असल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.

रविवारी २९४६ नव्या रुग्णांचे निदान झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने दिली आहे. रविवारी राज्यात करोनाच्या दोन रुग्णांचे निधन झाले असून, करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १.८६ टक्क्यांवर आले आहे. राज्यात दिवसभरात १,४३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ७७,४६,३३७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्के आहे. राज्यात एकूण १६, ३७० करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत करोनाच्या १८०३ रुग्णांचे निदान झाले असून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे; तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबईतील स्थिती

बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७ टक्के

५ ते ११ जूनपर्यंत करोनावाढीचा दर – ०.१३३ टक्के

रुग्णदुपटीचा दर – ५१३ दिवस

गंभीर व दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण – ११,०८५

सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण – ३०

आयसीयू खाटा, तसेच व्हेन्टिलेटरची क्षमता – १५२४

ऑक्सिजन खाटा- ४७४८

अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध – ९५१०

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button