वातावरण बदलतेय; आरोग्य सांभाळा, उष्णता आणि गारव्याने दुखण्यांत वाढ
![The climate is changing; Take care of health, increase in pain due to heat and nauseaThe climate is changing; Take care of health, increase in pain due to heat and nausea](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/The-climate-is-changing-Take-care-of-health-increase-in-pain-due-to-heat-and-nausea.jpg)
उष्णता आणि गारव्याने दुखण्यांत वाढ
नाशिकः सध्या पावसाने ओढ दिली असली तरी दिवसा उष्ण व रात्री थंड अशा मिश्र वातावरणाची अनुभूती नाशिककरांना येत आहे. हे वातावरण आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. यासह येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. आहारात योग्य बदल करण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सध्या खोकल्याचा त्रास होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. वातावरणाच्या बदलांमुळे कफ होण्याची शक्यता आहे. हे कफ छातीत साठू न देता शरीराबाहेर निघणे आवश्यक असते. यासाठी डॉक्टरांच्या योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये. तळलेले पदार्थही टाळावेत. आहारात गरम पदार्थांचा समावेश असावा. पिण्याचे पाणी गाळलेले किंवा उकळलेले असावे. पावसात भिजणे टाळा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल होत आहेत. दिवसभर उन्हाचा चटका आणि सायंकाळी सातनंतर गारवा असे सध्याचे वातावरण आहे. यामध्ये कफच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याचबरोबर तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.