पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची २० वी बैठक संपन्न
पिंपरी, | पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची २० वी बैठक विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी स्मार्ट सिटी कार्यालय, ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
यावेळी, महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. शेखर सिंह, नामनिर्देशक संचालक (GOI) श्रीम. ममता बत्रा, स्वतंत्र संचालक श्री. यशवंत भावे, श्री. प्रदीपकुमार भार्गव, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. अंकुश शिंदे (ऑनलाईन), सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किरणराज यादव, शहर अभियंता श्री. मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी श्री. सुनिल भोसले, कंपनी सेक्रेटरी श्रीम. चित्रा पंवार, महाव्यवस्थापक श्री. अशोक भालकर, कार्यकारी अभियंता श्री. मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह अधिकारी तसेच सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये विविध विषयांवर संचालक मंडळाने चर्चा केली. तसेच, स्मार्ट सिटी प्रकल्पांचा सर्विस्तर आढावा घेतला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या कालमर्यादेबाबत संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच, मे. टेक महिंद्रा आणि मे. एल अँड टी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष चर्चा करून प्रकल्प अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. सन २०२१-२२ या आथिर्क वर्षाचा ताळेबंद मंजूर करून वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीसाठी शिफारस करण्यात आली. तसेच, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीमध्ये प्रकल्प सल्लागार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक प्रगतीबाबत सादरीकरण केले. त्यावर संचालक मंडळाद्वारे चर्चा होवून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.