Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात

मुंबई : शहरातील बेस्टच्या बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र, काहीजण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यात अशी घटना घडल्यामुळे सर्वच विचलित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक किसन धोंगडे हे ३२६ क्रमाकांची बस चालवत होते. ही बस शिवशाही प्रकल्प, दिंडोशी वरून कुर्ल्याकडे जात होती. त्यावेळी साधारण साडे तीन वाजेच्या सुमारास संतोष नगर बीएमसी कॉलनी, डी वार्ड समोरील मंदिराला बसने धडक दिली. बसने केवळ धडकच दिली नाही तर बस समोरील जेवढ्या रिक्षा होत्या त्या सर्व रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात बस चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले असून काही बस प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेदांत खासगी रूग्णालय, दिंडोशी येथे उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, जखमीवर नजीकच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी बसमध्ये प्रवासीही होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे कळत आहे. परिस्थिती गंभीर असतानाही चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button