Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

… तर, मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट; तलावात पाणीसाठी किती शिल्लक?

मुंबईः मान्सूनच्या आगमनाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रात रिमझिम बरसात सुरू असून, गेल्या दोन दिवसांत एकूण २७९ मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. तलावांमध्ये सध्या एक लाख ९८ हजार ५६८ दशलक्ष लिटर (१३.७२टक्के) पाणीसाठा असून, तो पुढील ५० दिवस म्हणजे ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईला सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. सात तलावांपैकी विहार व तुळशी तलाव मुंबईत भागात असून, उर्वरित पाच मोठे तलाव हे ठाणे, पालघर जिल्ह्यात आहेत. या तलावांपैकी सर्वात जास्त म्हणजे एकूण पाणीसाठ्याच्या सुमारे ५० टक्के (७,१७,०३७ दशलक्ष लिटर)पाणीपुरवठा एकट्या भातसा तलावातून केला जातो. मागील दोन दिवसांत तुळशी तलावात सर्वाधिक ९३ मिमी, विहार ८५ मिमी, तानसा ५४ मिमी, भातसा २१ मिमी, मोडकसागर २० मिमी, तर मध्य वैतरणा ४ मिमी व उच्च वैतरणात २ मिमी इतका कमी पाऊस पडला आहे.

… तर पाणीकपात

गेल्या दोन वर्षांतील ९ आणि १० जूनच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. मात्र, पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा अधिक आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, कमी पाऊस पडल्यास तलावातील एकूण पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कमी-अधिक प्रमाणात पाणीकपात करावी लागते.

मागील आढावा

जून २०२० : १,९२,४०७ दशलक्ष लिटर (१३.२० टक्के)

जून २०२१ : १,८२,९०२ दशलक्ष लिटर (१२.६४ टक्के)

जून २०२२ : १, ९८,५६८ दशलक्ष लिटर (१३.७२ टक्के)

तलाव

उच्च वैतरणा ०

मोडकसागर ४७,७४६

तानसा ९,७०९

मध्य वैतरणा ३८,१५१

भातसा ९६,८४४

विहार ३,८३२

तुळशी २,२८६

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button