Bhosari Mahotsav 2022: ‘रिया भरवाल मिस भोसरी तर अरविंद बोर्डे मिस्टर भोसरी’
!["Riya Bharwal is Miss Bhosari and Arvind Borde is Mr. Bhosari"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/‘रिया-भरवाल-मिस-भोसरी-तर-अरविंद-बोर्डे-मिस्टर-भोसरी.jpg)
पिंपरी: भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या “भोसरी महोत्सव २०२२” मध्ये झालेल्या फॅशन आयकॉनिक स्पर्धेत मिस भोसरीचा किताब रिया भरवाल तर मिस्टर भोसरीचा किताब अरविंद बोर्डे यांनी जिंकला. तसेच “हिट द फ्लोअर २०२२” या नृत्य स्पर्धेत श्री दळवी यांनी वैयक्तिक गटात तर सामुहिक गटात क्विक्झॉटिक ग्रूपने प्रथम क्रमांक मिळविला. “गोल्डन व्हॉईस २०२२” या गायन स्पर्धेत शुभांगी कंगणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
भोसरी कला, क्रीडा मंचचे अध्यक्ष व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी संयोजन केलेल्या कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात भोसरी महोत्सव २०२२ आयोजित केला आहे.
यामध्ये फॅशन आयकॉनिक मिस भोसरीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया भरवाल, द्वितीय क्रमांक वैष्णवी शेट्टी यांनी तर तृतीय क्रमांक अभिलाषा ढवळे यांनी मिळविला. तर “मिस्टर भोसरी” स्पर्धेत अरविंद बोर्डे यांनी प्रथम, शुभम यळवंडे यांनी द्वितीय तर जफर खान यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गौरी कदम आणि तुषार पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
वैयक्तिक नृत्य गटात श्री दळवी यांनी प्रथम, तर नितीन गौड द्वितीय, प्राची पवार तृतीय आणि रितेश गोपाळा यांनी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. तर सामुहिक नृत्य गटात क्विक्झॉटिक ग्रूपने प्रथम, एंजल्स क्यु ब्राड वे यांनी द्वितीय, वाईल्ड बीट आणि डी डब्ल्यू गटाने तृतीय क्रमांक पटकाविला. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरज आकाश यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे निवेदन प्राची कांबळे यांनी केले. स्पर्धकांना आमदार उमा खापरे, उज्ज्वला गावडे, राजश्री गागरे, सुनंदा फुगे, कविता हिंगे, आशा काळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
‘गोल्डन व्हॉईस व्हाइस २०२२’ या कराओके गायन स्पर्धेत प्रथम शुभांगी कंगणे यांनी प्रथम, संतोष लांडगे यांनी व्दितीय तर अनिल झोपे यांनी तृतीय मिळवला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ई टीव्ही मराठी सूर गृहलक्ष्मीचा विजेती ज्योती गोराणे, गायक अक्षय लोणकर, गायक रोहीदास माने यांनी काम पाहिले. विजेत्यांना पंडीत कल्याण गायकवाड बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी मंचचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, कार्याध्यक्ष विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, माजी नगरसेवक संतोष लोंढे, पंडीत गवळी, निवृत्ती फुगे, किशोर गव्हाणे, नंदकुमार दाभाडे, किरण लांडगे, भाऊसाहेब डोळस, गौरी लोंढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनात विजय लांडगे, दत्ता फुगे, संदीप राक्षे, नंदू लोंढे, यशवंत डोळस, शाम लांडगे, सतिश फुगे, मनोज जगताप, बाळासाहेब भालेराव, जीवन फुगे आदींनी सहभाग घेतला. स्वागत माजी नगरसेवक सुनंदा फुगे, सूत्रसंचालन निकीता बहिरट आणि आभार विजय फुगे यांनी मानले.