रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला
![Rashmi Shukla meets Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Rashmi-Shukla-meets-Fadnavis.jpg)
मुंबई: महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप करण्याचा आरोप असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसत आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला. बाळासाहेब थोरात गुरुवारी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. सागर बंगला कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असे म्हणत थोरातांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याविषयी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना विचारणा करण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी म्हटले की, माझा फोन टॅप झाल्याचे उघड झाले होते. ही गोष्ट मला चुकीची वाटते. गांजा तस्करीचे कारण पुढे करून माझा फोन टॅप झाल्याचे निष्पन्न झाले होते. असे घडत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
रश्मी शुक्लांचं पोस्टिंग महाराष्ट्रात होणार?
फोन टॅपिंग प्रकरणाची सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. गुरुवारी म्हणजे आज सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे. त्याच्या एक दिवस आधीच रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. गुरुवारी म्हणजे आज सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे. त्याच्या एक दिवस आधीच रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.