जो शाखा अध्यक्ष चांगले काम करणार, त्याच्या घरी स्वतः जेवायला जाणार, राज ठाकरे
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तीन दिवसांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितल्यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक नंतर तीन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुणे शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत.
या बैठकदरम्यान त्यांनी आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. मनसेचा जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायलाय जाणार आहोत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.
आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या पुणे दौर्यावर आहेत. या दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमाअंतर्गत संवाद साधला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.