Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसताच राहुल नार्वेकरांचा रेकॉर्ड, देशभरात नाव

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

राहुल नार्वेकर एके काळी आदित्य ठाकरेंचे खास होते. त्यांनी युवा सेनेत काम केलं होतं. १५ वर्ष कट्टर शिवसैनिक राहिले. आदित्य ठाकरेंचे खास असल्यामुळे त्यांचा दबदबाही तसाच होता. पण शिवसेनेने त्यांचा मान राखला नाही आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ नेत्यांपर्यंत म्हणजेच उद्धव ठाकरेंपर्यंत आपल्याला पोहोचू दिलं जात नसल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर नार्वेकरांना राष्ट्रवादीने संधी दिली आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक ते मावळ मतदारसंघातून लढले. २०१४ ला मोदी लाट होती, ज्यात मावळच काय, पण अख्ख्या राष्ट्रवादीचाही सुपडासाफ झाला होता. पुढे काही काळ राष्ट्रवादीत ते फारसे सक्रिय दिसले नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री म्हणून विधिमंडळातील पहिल्याच भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘महाराष्ट्रात आज भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालं आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. राज्यानेच नाही, तर देशाने या घटनेची नोंद घेतली. सत्तेतून पायउतार होऊन लोक बाहेर पडले. मी नगरविकास मंत्री होतो, माझ्यासह आठ ते नऊ मंत्री बाहेर पडले. एकीकडे राज्यातील आणि देशातील मोठमोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा हा सैनिक एकनाथ शिंदे होता, असं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या आपल्या पहिल्या भाषणात म्हटलं आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकरांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच केली.
राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत.
१५ वर्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत काम केलं.
आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे खास मित्र होते.
२०१४ ला राहुल नार्वेकरांनी शिवसेना सोडली.
यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीकडून २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली.
शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांचा पराभव झाला.
२०१९ ला राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला.
भाजपने कुलाबा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली.
मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या कुलाबा मतदारसंघाचे ते आमदार झाले.
राहुल नार्वेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
नार्वेकर हे एक वकील सुद्धा आहेत.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button